मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अश्लिल व्हिडिओ प्रकरणी अटक करण्यात आली असून तो सध्या तुरुंगाl आहे. तुरुंगात राहूनही राजचा ताठा तसूभरही कमी झालेला नाही. कारण तो पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करत नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार राज कुंद्राची सध्या पोलीस चौकशी करत आहे. परंतु पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांना राज नीट उत्तरं देत नाही. आपण या प्रकरणातून सहजपणे बाहेर पडू अशी राजला खात्री असल्याने तो पोलिसांना मदत करत नसल्याचं म्हटलं जात आहे. यावर पोलिसांनी सांगितले की, राज कुंद्राविरोधात आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणातून त्याची सुटका होणे कठीण आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज त्याच्या बायकोला, शिल्पा शेट्टीला वाचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करत नसावा, अशीही शक्यता आहे. परंतु याप्रकरणी शिल्पाचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजच्या चौकशीवेळी त्याने जर शिल्पाचे नाव घेतले तर ती देखील अडचणीत येऊ शकते. जर राजने पोलिसांना सहकार्य केले नाही तर त्याची कठोर पद्धतीने चौकशी केली जाईल, असेही सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, याला २३ जुलै पर्यंत पोलिस कोठडीत ठेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही मुदत उद्या संपते आहे. यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात सादर केले जाईल, तेव्हा त्याच्या संदर्भात कोणता निकाल दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. अश्लिल व्हिडिओ बनवले जात असून ते इंटरनेटवर अपलोड केले जात असल्याची तक्रार पोलिसांकडे फेब्रुवारीमध्ये दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रान्चचे अधिकारी करत होते. या तपासामध्ये अनेकांच्या विरोधात सबळ पुरावे त्यांना मिळाले आणि त्यांनी त्या व्यक्तींना अटकदेखील केली. यामध्ये सातत्याने राज कुंद्राचे नाव येत होते. त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळाल्यानंतर त्याला सोमवारी रात्री चौकशीसाठी बोलवण्यात आले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3x0ZMMH