मुंबई- मराठी मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. श्रुतीने फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात तिचं स्थान निर्माण केलं. आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकणारी श्रुती कायमचं चाहत्यांमध्ये चर्चेत असते. श्रुती नेहमीच निरनिराळे फोटोशूट करून चाहत्यांची वाहवा मिळवत असते. श्रुतीच्या व्हिडिओंना देखील चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. परंतु, नुकत्याच केलेल्या एका फोटोशूटमुळे श्रुती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. श्रुतीच्या मेकअपमुळे नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. श्रुतीने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आणि त्याचे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केले. या फोटोंमध्ये श्रुती पिवळ्या रंगाचा कोट पांढऱ्या रंगाचं शर्ट घालून दिसत आहे. त्यासोबत श्रुतीने गडद मरून रंगाची लिपस्टिक लावली आहे आणि सोबत पांढऱ्या रंगाचं आयलायनर लावलं आहे. सगळ्या फोटोंमध्ये श्रुतीचं लायनर उठून दिसत आहे. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी श्रुतीला ट्रोल केलं आहे. एका युझरने म्हटलं, 'घरातली लहान मुलं घाबरतील', तर आणखी एका युझरने म्हटलं, 'चुना लावलाय वाटतं'. मेकपबद्दल लिहित एका युझरने कमेंट केली, 'मेकअपचा मोक्कार थर, काही गरज आहे का?' तर एका युझरने श्रुतीला भुताची उपमा दिली. आणखी एका युझरने म्हटलं, 'अरे बापरे... एकादशीच्या दिवशी मी हे काय पाहिलं.' अशा अनेक कमेंट श्रुतीच्या फोटोंवर आल्या आहे. अनेक युझर्सनी श्रुतीला तू आहेस तशीच सुंदर आहेस, उगीच मेकअप करून चेहरा बिघडवू नको, असा सल्ला दिला आहे. श्रुतीने 'रमा माधव', 'तप्तपदी', मुंबई- पुणे- मुंबई-२' आणि बंध नायलॉनचे' सारख्या चित्रपटात काम केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WdBQZK