Full Width(True/False)

व्हायरल फोटोंमध्ये ऐश्वर्या रायसोबत दिसणारा 'तो' मुलगा कोण?

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचे काही फोटो काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यामुळे दोघंही चर्चेत आले होते. या फोटोंमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे आर. सरथकुमार आणि त्यांची मुलगी अभिनेत्री वरलक्ष्मी यांच्यासोबत दिसले होते. त्याआधी ऐश्वर्या प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर झाल्या होत्या. पण आता ऐश्वर्याचे एका मुलासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे सध्या चर्चेत आहेत. सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत असलेल्या ऐश्वर्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात ती एका मुलासोबत पोझ देताना दिसत आहेत. त्यामुळे ऐश्वर्यासोबत फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा कोण आहे याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विजय सेतुपतिचा मुलगा राघवन आहे. सध्या ऐश्वर्या राय '' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. विशेष म्हणजे राघवनही या चित्रपटाचा भाग आहे. राघवननं त्याच्या सोशल मीडियावर ऐश्वर्यासोबतचे हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं, 'चित्रपट 'पोंनियिन सेलवन'च्या शूटिंग ब्रेकमध्ये ऐश्वर्यासोबत फोटो. तिच्यासोबत काम करण्याची मजा काही वेगळीच आहे.' काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि आराध्या यांचे वरलक्ष्मीसोबतचे काही फोटो व्हायरल झाले होते. यात तिचं वजन वाढलेलं दिसत आहे. याशिवाय फोटोत बेबी बंपही दिसत आहे. याचमुळे युझर्सना ऐश्वर्या लवकरच गोड बातमी देणार असं वाटत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WASjaB