Full Width(True/False)

जिओचे टॉप ५ जबरदस्त रिचार्ज प्लान, एका दिवसात कितीही वापरा डेटा

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () आपल्या युजर्संसाठी लागोपाठ नवीन नवीन रिचार्ज प्लान आणत आहे. कंपनीने गेल्या काही दिवसात Jio Freedom प्लान आणले आहे. या प्लानमध्ये युजर्संना डेटा लिमिट मधून मुक्तता मिळते. म्हणजेच युजर्संना या प्लानमध्ये एकूण डेटा पैकी कितीही डेटा खर्च करता येवू शकतो. या प्लानमध्ये डेली डेटाची लिमिट नाही. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः १२७ रुपयाचा प्लामध्ये फ्री कॉलिंग आणि १२ जीबी डेटा रिलायन्स जिओकडे १२७ रुपयांच्या प्लानची वैधता १५ दिवसांची आहे. प्लानमध्ये युजर्संना एकूण १२ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये नो डेली डेटा प्लानमध्ये १०० एसएमएस पाठवता येवू शकतात. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. २४७ रुपयांचा प्लानमध्ये फ्री कॉलिंग आणि २५ जीबी डेटा रिलायन्स जिओच्या २४७ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३० दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये एकूण २५ जीबी डेटा मिळतो. युजर्स प्लानमध्ये कितीही डेटाचा वापर करू शकतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ४४७ रुपयांच्या प्लानमध्ये ६० दिवसाची वैधता आणि ५० जीबी डेटा जिओच्या फ्रीडम प्लानमध्ये ४४७ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्संना ६० दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये एकूण ५० जीबी डेटा मिळतो. या डेटा मध्ये युजर्स कितीही डेटाचा वापर करू शकतो. रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० SMS सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ५९७ रुपयांचा प्लानमध्ये ९० दिवसांची वैधता आणि ७५ जीबी ड़ेटा रिलायन्स जिओच्या ५९७ रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्संना ९० दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये एकूण ७५ जीबी डेटा मिळतो. या डेटा मध्ये प्रत्येक डेटा युज करू शकता. कोणतीही लिमिट नाही. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगची सुविधा आहे. रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. ३६५ दिवसाची वैधता आणि ३६५ जीबी डेटाचा प्लान रिलायन्स जिओचा २३९७ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३६५ दिवसांची वैधता दिली जाते. प्लानमध्ये एकूण ३६५ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा आहे. तसेच जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BWlGEt