Full Width(True/False)

२०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत २ महिने वैधता, रोज २ जीबी डेटा, जिओचा जबरदस्त प्लान

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) कडे अनेक स्वस्त रिचार्ज प्लान आहेत. ज्यात खास ऑफर दिली जाते. दोन महिने (५६ दिवस) ची वैधता मिळते. प्लानमध्ये २ जीबी डेटा मिळतो. जिओचा हा प्लान १८५ रुपयांचा आहे. हा रिचार्ज प्लान जिओ फोनसाठी आहे. या रिचार्ज मध्ये बाय वन गेट वन फ्री ऑफर आहे. म्हणजेच एका रिचार्जवर दुसरा फ्री मिळतो. जाणून घ्या जिओ फोनच्या या प्लानमध्ये युजर्संना कोणकोणते फायदे मिळत आहेत. वाचाः १८५ रुपयांचा प्लान, रोज 2GB डेटा रिलायन्स जिओच्या १८५ रुपयांच्या प्लानमध्ये बाय-वन-गेट-वन फ्री ऑफर आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. ऑफर अंतर्गत प्लान मध्ये तुम्हाला रोज २ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच प्लानमध्ये युजर्संना एकूण 112GB डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. सोबत रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः १५५ रुपयांत दोन महिन्याची वैधता, रोज १ जीबी डेटा रिलायन्स जिओ फोनच्या १५५ रुपयांच्या रिचार्ज प्लानवर या ऑफर अंतर्गत एक प्लान घेतल्यास दुसरा फ्री आहे. ऑफर अंतर्गत प्लानमध्ये युजर्संना जवळपास दोन महिने (५६ दिवस) वैधता मिळते. प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा मिळतो. जिओ फोनच्या या प्लानमध्ये एकूण 56GB डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग सोबत रोज १०० SMS पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rpvMbY