Full Width(True/False)

अखेर आज भारतात लाँच होणार OnePlus Nord 2 5G, येथे पाहा लाईव्ह स्ट्रिमिंग

नवी दिल्ली. चाहत्यांसाठी एकी आनंदाची बातमी आहे. कंपनी आज नवीन हँडसेट OnePlus Nord 2 5G, भारतात लाँच करणार आहे. वनप्लसने याची पुष्टी केली होती की स्मार्टफोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते, जी ६५ डब्ल्यू रॅप चार्जिंग फीचरसह देण्यात येईल. कंपनीने असा देखील दावा केला आहे की, १५ मिनिटांच्या चार्जिंगवर हा फोन पूर्ण दिवस टिकू शकतो. इतर कोणती वैशिष्ट्ये या फोनमध्ये देण्यात आली आहे, जाणून घ्या सविस्तर. वाचा: OnePlus Nord 2 5G, चे लाईव्ह स्ट्रिमिंग व्हर्च्युअल लाँच इव्हेंटद्वारे OnePlus Nord 2 5G लाँच करण्यात येईल. त्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या अधिकृत YouTube चॅनेलवर तुम्हाला पाहता येईल. आज सायंकाळी साडेसहा वाजता इव्हेंटचे प्रक्षेपण होईल. OnePlus Nord 2 5G, ची अपेक्षित किंमत: OnePlus Nord 2 5G, ची किंमत सुमारे ३०,००० रुपये असल्याचे सांगितले जात आहे. हा फोन बजेट फोन नसून OnePlus Nord CE पेक्षा महाग असू शकतो. काही मीडिया रिपोर्टनुसार OnePlus Nord 2 5G ची किंमत ३१,९९९ रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. OnePlus Nord 2 5G, ची संभाव्य वैशिष्ट्ये: OnePlus Nord 2 5G मध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी १२०० चिपसेट दिले जाऊ शकते. यात ८ जीबी आणि १२ जीबी रॅम देण्यात येण्याची शक्यता आहे. यात १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते. तसेच यात ६.४३ इंचाचा एमोलेड पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच त्याचा रीफ्रेश दर ९० हर्ट्झ असू शकतो. त्याचे प्रसर गुणोत्तर २०:९, रिझोल्यूशन फुल एचडी प्लस आहे. OnePlus Nord 2 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देता येईल. तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर देखील यात देण्यात येईल. OnePlus Nord 2 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचे प्राथमिक सेन्सर ५० मेगापिक्सलचे सोनी आयएमएक्स ७६६ असेल . दुसरे ८ मेगापिक्सेल आणि तिसरे २ मेगापिक्सेल असेल. ऑक्सीजन ओएसवर आधारित हा फोन अँड्रॉइड ११ वर काम करतो. कंपनीने पुष्टी केली आहे की, फोनमध्ये ४५०० एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते, जी ६५ डब्ल्यू रॅप चार्जिंग फीचरसह येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zpTyaS