मुंबई : छोट्या पडद्यावर अल्पावधीतच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी '' ही मालिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील सरूआजी हे पात्र आणि त्यांच्या तोंडी असलेल्या एका संवादामुळे ही चर्चा रंगलीय. १३ जुलैला प्रक्षेपित झालेल्या मालिकेच्या भागातील एका प्रसंगात सरूआजींच्या तोंडी एक म्हण आहे. 'आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी' या आशयाची ही म्हण संवादात वापरण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मालिकेतील प्रसंगाच्या या व्हिडिओत 'आपलीच मोरी आणि...' या संवादात अश्लील अपशब्द कानावर पडत असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. याबाबत मालिकेवर आणि वाहिनीवर टीका होतेय. परंतु, अशाप्रकारे संवादात अश्लील शब्द न वापरल्याचं वाहिनीनं स्पष्ट केलं आहे. याबाबत झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर म्हणाले, 'हा खोडसरपणा आहे. मुद्दाम वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं आहे. एक जबाबदार वाहिनी म्हणून आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील संवादाचा वापर केलेला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; हे पडताळून पाहण्यासाठी वेगळी टीम कार्यरत असते. तसंच ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे; त्या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत; त्या अशाप्रकारचा संवाद मुळात बोलणारच नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर जे बिंबवलं जात आहे ते चुकीचं आहे.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eppiVv