Full Width(True/False)

बाबिलने शेअर केला इरफान खान यांचा 'तो' शेवटचा मेसेज,झाला भावुक

मुंबई- बॉलिवूड अभिनेते यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. २९ एप्रिल २०२० रोजी कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अभिनयाने त्यांनी चाहत्यांना वेड लावलं. अनेक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी त्या भूमिका अजरामर केल्या होत्या. आजही चाहत्यांना त्यांच्या जाण्याचं प्रचंड दुःख आहे. इरफान यांचा मुलगा बाबिलही त्यांच्या जाण्याचं दुःख व्यक्त करतो. तो अनेकदा त्याच्या वडिलांबद्दल सोशल मीडियावर काहीनाकाही शेअर करत असतो. पुन्हा एकदा बाबिलने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यावेळेस बाबिलने सोशल मिडीयावर इरफान यांचा एक जुना मेसेज शेअर केला आहे. हा मेसेज इरफान यांनी बाबिलला मार्च २०२० मध्ये केला होता. त्यांनी लिहिलं होतं, 'तू फोन सोबत घेऊन ये, मी पुढचं पाहून घेईन.' दुसरा मेसेज होता, 'जेव्हा मोकळा वेळ मिळेल तेव्हा मला फोन कर.' तर तिसरा मेसेज होता, 'बाबिल मला लगेच फोन कर, खूप महत्वाचं आहे.' हे मेसेज बाबिलने तेव्हा पहिले जेव्हा तो त्याच्या फोनमधून जुने मेसेज डिलीट करत होता. तेव्हा त्याच्या फोन मध्ये त्याला हे मेसेज दिसले. ते मेसेज पाहून भावुक झाला होता. त्याने हे मेसेज सोशल मीडियावर शेअर केले आणि लिहिलं, 'हे अत्यंत वेगळ्या पद्धतीचं काहीतरी घडलंय, जे समजावणं खूप अवघड आहे. मी तर माझ्या व्हाट्सअँप मधून काहीतरी डिलीट करत होतो तेव्हा माझी नजर या मेसेजवर पडली. माहीत नाही का पण मी आता या मेसेजवर उत्तर देणार होतो. मला जणू असं वाटलं की ते माझ्या सोबतचं आहेत इथे कुठेतरी.' सोशल मीडियावर जेव्हा बाबिलची ही पोस्ट वायरल झाली तेव्हापासून इरफान यांचे चाहते प्रचंड भावुक झाले आहेत. ते बाबिलचं दुःख समजू शकतात. तो त्याच्या वडिलांच्या आठवणीने दुःखी झाला आहे. यापूर्वीही बाबिलने इरफान यांच्यासाठी अनेक पोस्ट केल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3b2BslW