Full Width(True/False)

करोना काळात प्रेक्षकांना हसवणाऱ्या विनोदवीरांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील ‘माझा पुरस्कारां’चं वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते नुकतंच झालं. यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकारांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. 'माझा पुरस्कार' सोहळ्याची १२ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं हे पुरस्कार वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच व्हावं, अशीच आपली इच्छा होती आणि ती आज पूर्ण होतेय, याचा विशेष आनंद आहे, असं अशोक मुळ्ये यांनी आवर्जून सांगितलं. या कार्यक्रमात , , , , नम्रता संभेराव, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर आदी कलाकारांना यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. 'करोनाकाळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यासारखा कार्यक्रम म्हणजे रामबाण लस आहे', अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलाकारांचं कौतुक केलं. कार्यक्रमातील कलाकारांनीदेखील या पुरस्काराबद्दल आभार मानले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e8rTCV