मुंबई: बिग बॉस फेम नेहमीच त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अर्थात केआरकेचे ट्वीट किंवा विधानं कोणी गांभीर्यानं घेतं नसलं तरीही अनेकदा तो असं काही बोलून जातो की, सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं जातं. केआरकेनं नुकतीच अभिनेत्री करिना कपूरची दोन्ही मुलं आणि अभिनेत्री यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. पण त्यानं जे काही बोललं आहे त्यामुळे सोशल मीडिया युझर्स भडकले असून त्यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे आणि आपल्या मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. सोशल मीडियावर आणि विशेषतः ट्विटरवर कमालीचा सक्रिय असतो. तो नेहमीच अभिनेता, अभिनेत्री, त्यांचे चित्रपट याविषयी वेगवेगळी विधानं करताना दिसतो. यावेळी त्यानं अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि करिना कपूर यांच्याबद्दल भविष्यवाणी केली आहे. प्रियांकाबद्दल बोलताना केआरकेनं लिहिलं आहे की, तिचा पती तिला पुढच्या १० वर्षांमध्ये घटस्फोट देईल. तर दुसरीकडे त्यानं करिनाच्या मुलांबद्दल भविष्यवाणी केली आहे. करिनाच्या मुलांची नावं योग्य नसल्यानं ते आपल्या आई-वडिलांप्रमाणे उत्तम कलाकार होऊ शकणार नाही असं म्हटलं आहे. करिना कपूर आणि प्रियांका चोप्राबाबतच्या अशा भविष्यवाणीनंतर केआरकेला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका युझरनं कमेंट करताना लिहिलं, 'कधीतरी कोणाबद्दल तरी चांगलं बोलत जा' दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'स्वतःच्या मर्यादा कशा पाळायच्या हे तुला शिकवलं गेलं पाहिजे. ते त्याच्या आयुष्यात काहीही करु देत. पण तुला त्यांच्या खासगी आयुष्याबाबत बोलण्याचा काहीच अधिकार नाही.' याशिवाय आणखी काही युझर्सनी कमेंट करत केआरकेला सुनावलं आहे. अन्य एका युझरनं लिहिलं, 'आता हे थोडं जास्तच होत आहे. कृपया दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यावर कमेंट करणं बंद कर.' दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'स्वतः चांगला दिसत तर नाहीसच पण किमान चांगलं बोलायला तर शिक.' आणखी एका युझरनं आपल्या कमेंटमध्ये लिहिलं, 'कधीही दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यावर कमेंट करू नये कारण कर्म खूप शक्तीशाली असतं.' दरम्यान केआरकेला त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ट्रोल केलं गेल्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. तो सातत्यानं बॉलिवूड सेलिब्रेटींवर कमेंट आणि टीका करताना दिसतो. अलिकडच्याच काळात अभिनेता सलमान खानसोबतचा त्याचा वाद चांगलाच गाजला होता. एवढंच नाही तर हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेलं होतं. सलमाननं त्याच्या विरोधात मानहानिचा खटला दाखल केला होता. त्यानंतर मीका सिंग आणि केआरके यांच्यात वाद सुरू झाले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3k2baVH