Full Width(True/False)

'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय'; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मुंबई: मराठी सारेगमप लिटल चॅम्पसचं नवीन पर्व नुकतंच सुरू झालं असून आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, रोहित राऊत,मुग्धा वैशंपायन आणि कार्तिकी गायकवाड ही महाराष्ट्राची लाडकी पंचरत्न आता थेट परीक्षकांच्या खुर्चीत बसले आहेत. असं असलं तरी आता हे सर्व जणं सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. कार्यक्रमाची सुत्रसंचालक देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. काही दिवसांपूर्वी मृण्मयीनं एका मुलाखतीत 'आमच्या शोमुळे ट्रोलर्सचा धंदा चाललाय', असं म्हटलं होतं. त्यानंतर ट्रोलर्संनी मृण्मयीवर आणखीच बनवून व्हायरल केले आहेत. या मीम्सचा सोशल मीडियावर पाऊस पडला आहे. असं असलं तरी चाहत्यांकडून ट्रोलर्सनाही सुनावलं जात आहे. पंचरत्न आणि मृण्मयीला ट्रोल करणाऱ्यांना सडेतो ड उत्तर 'समोर असलेले परीक्षक आणि अँकर खूपच आरडाओरडा करतात!' असं एका नेटकऱ्यानं लिहिलं होतं. या वक्तव्याला उत्तर देत मृणमयीनं म्हटलंय, 'तुम्ही या मुलांचं गाणं ऐकून काय केलं असतं? शांत बसला असतात का ?' तिनं दिलेलं हे सडतोड उत्तर वाचून अनेकांनी प्रतिक्रिया देत मृण्मयीलाच पाठिंबा दिला आहे. तर काहींनी जुनेच पर्व चांगलं असल्याचं म्हणत त्यावेळी सूत्रसंचालन करणारी पल्लवी जोशीची आठवण काढली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zeJNfk