नवी दिल्ली : टेलिकॉम कंपन्या डेटा, कॉलिंग, एसएमएससह येणारे अनेक दमदार प्लान्स ग्राहकांसाठी आणत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांकडे जास्त फायदे दिले जात आहे. टेलिकॉम कंपनी आपल्या प्लान्समध्ये दिवसाला ४ जीबी ऑफर करत आहे. अंतर्गत यूजर्सला ४ जीबी डेटा दिला जात आहे. तुम्ही डेटाचा जास्त वापर करत असाल तर हा प्लान निवडू शकता. वाचा: Vi चा २९९ रुपयांचा प्लान वीआयचा हा प्लान डबल डेटा ऑफरसह येतो. यामध्ये यूजर्सला दररोज ४ जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज १०० एसएमएस देखील मिळतात. हा प्लान वीकेंड रोलओवर डेटा बेनिफिट्ससह येतो. म्हणजेच, सोमवार ते शुक्रवारीपर्यंत वाचलेला डेटा वीकेंडला वापरता येईल. प्लानमध्ये चा अॅक्सेस मिळेल. वाचा: Vi चा ४४९ रुपयांचा प्रीपेड प्लान डबल डेटा ऑफरसह येणाऱ्या या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज ४ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील यामध्ये मिळते. या प्लानमध्ये देखील वीकेंड डेटा रोलओवर आणि Vi Movies and TV चा अॅक्सेस मिळेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zm3Fxo