नवी दिल्लीः Prevention: सध्या वाय फाय (WiFi) आणि इंटरनेटचा जमाना आहे. घरा पासून ते ऑफिस किंवा सार्वजनिक ठिकाणापर्यंत प्रत्येक ठिकाणी वाय फायचा वापर करण्यात येतो. आधीच्या तुलनेत याचा वापर जास्त वाढला आहे. नेहमी असं पाहिलं जात की, ऑफिस मध्ये लावलेल्या वाय फायची स्पीड अचानक स्लो झाली आहे. याचे अनेक कारण असू शकतात. परंतु, याचे सर्वात मोठे कारण असू शकते ते म्हणजे, वाय फाय हॅक करणे, सध्या वाय फाय हॅक करणे सामान्य बाब झाली आहे. याच्या पासवर्डला हॅकर्स सहज ब्रेक करू शकतात. वाय फायला हॅकर्स पासून सुरक्षित ठेवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः ला हॅक होण्यापासून या स्टेप करा फॉलो >> सर्वात आधी आपला वाय फायचा राउटर रिसेट करा आणि आपला पासवर्ड बदला. >> यासाठी गुगल क्रोमवर जा. त्या ठिकाणी आपला राउटरची यूआरएल टाका. >> यूआरएल टाकताच आपली लॉगीन आयडी आणि पासवर्ड एन्टर करा. >> आता आपल्या होम पेजवर जाऊन वायरलेस पासवर्ड एंटर करा. >> वायरलेस वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर वायरलेस सिक्योरिटीचा ऑप्शन येईल. यावर क्लिक करा. >> हे सर्व केल्यानंतर सर्वात खाली एक पासवर्ड चेंज करण्याचा ऑप्शन मिळेल. >> या ठिकाणी तुमचा वाय फायचा दुसरा पासवर्ड सेट करून अप्लाय वर क्लिक करा. >> लक्षात ठेवा, वाय फायचा पासवर्ड असा ठेवा की, मोठ मोठ्या हॅकर्सला तो मोडता नाही आला पाहिजे. >> आपल्या वाय फाय ला हॅकर्स पासून वाचवण्यासाठी तुम्ही काही ठराविक दिवसांच्या अंतराने पासवर्ड चेंज करीत राहा. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AULoc1