मुंबई: महाभारतात भीष्माची भूमिका साकारणारे अभिनेते यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत मुकेश खन्ना यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत यांच्याबद्दलच्या आठवणी शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये खन्ना बाळासाहेबांच्या भेटीविषयी सांगत आहेत. बाळासाहेब हयात असते तर मुंबईत आज जे काही चुकीचं घडतंय ते घडलंच नसतं, असं मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे. मुंबई, महाराष्ट्र आणि हिंदुत्वासोबत ज्यांचं नाव जोडलं गेलं, त्या हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज आठवण येत असल्याचं मुकेश खन्ना म्हणतात. संपूर्ण आयुष्यात त्यांना भेटण्याचा योग एकदाच आला, पण ती भेट अविस्मरणीय ठरली. मुंबईत बाळासाहेबांना पाहूनच लहानाचा मोठा झालो. मुंबईचा विकास पाहिला. मुंबईवर ज्यांचं वजन होतं. त्यांच्या नावाचा दरारा होता. एक प्रकारे महाराष्ट्रावरच त्यांचा कंट्रोल होता. त्यांना खुर्ची किंवा सत्तेची हाव कधीही नव्हती. पण त्यांच्या शब्दाला मान होता. मुंबईत शिवसेनेने बंद घोषित केला की, ठप्प व्हायची, इतर कुठल्या पक्षानं बंदची घोषणा केली असल्यास त्याच्याकडं लोकं दुर्लक्ष करायचे, असं मुकेश खन्ना यांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. बाळासाहेबांची सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, ते म्हणायचे गर्वानं सांगा की मी आहे. आपण हिंदू असल्याची सांगायला आज अनेकांना लाज वाटते. बाळासाहेब असते, तर ही परिस्थिती काही वेगळी असती. धर्मावरून मतभेद झाले नसते. तसंच, आज बाळासाहेबांची प्रचंड आठवण येतेय. ते असते तर हे सर्व घडलं नसतं. मुंबई बाळासाहेबांना खूप मीस करतेय, असं मुकेश यांनी व्हिडिओच्या शेवटी म्हटलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nSp8sD