नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने एक नवीन ऑफर आणली आहे. ही केवळ ब्रॉडबँड युजर्संना देण्यात येणार आहे. या अंतर्गत कंपनी गुगल स्मार्ट डिव्हाइस स्मार्ट डिव्हाइसला डिस्काउंट किंमतीवर उपलब्ध करीत आहे. ही ऑफर लाइव्ह करण्यात आली आहे. याचा लाभ ९० दिवसांपर्यंत घेता येवू शकतो. या दरम्यान, , सारख्या स्मार्ट डिव्हाइसला कमी किंमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या ही संपूर्ण ऑफर. वाचाः Google Mini ऑफर ही ऑफर खास करून FTTH, Air Fibre, DSL ब्रॉडबँड किंवा BBoWiFi यूजर्सला दिली जात आहे. परंतु, ही ऑफर सर्व युजर्संसाठी उपलब्ध नाही. कारण, त्या युजर्संसाठी डिझाइन करण्यात आली आहे. जी ७९९ रुपयांचा रिचार्ज करतात. किंवा वार्षिक ब्रॉडबँड प्लानचा वापर करतात. या ऑफर अंतर्गत जे युजर्स वार्षिक ब्रॉडबँड प्लान्सचा वापर करतात त्यांना गुगल नेस्ट हब आणि गुगल नेस्ट मिनी स्मार्ट डिव्हाइस अनुक्रमे १९९ रुपये आहे. ९९ रुपयांत मिळू शकतात. परंतु, यासाठी युजर्संना १२ आणि १३ महिन्यासाठी वन टाइम अमाउंट द्यावी लागते. वाचाः जे युजर्सं या ऑफरसाठी पात्र आहेत. ते ऑनलाइन पोर्टलद्वारे या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. युजर्संना आदी वार्षिक, द्विवार्षिक आणि त्रिवार्षिक ऑफर्सची निवड करावी लागणार आहे. परंतु, युजर्संना १०.५ महिने, २०.५ महिने आणि ३०.५ महिन्याचे पेमेंट करावे लागेल. हे वन टाइम चार्ज असणार आहे. यासाठी ७९९ रुपयांचा प्रति महिना रिचार्ज एकत्र करावा लागणार आहे. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे यासोबत Google Nest Mini ची किंमत ४ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, बीएसएनएल भारत फायबर युजर्सं डिव्हाइसला १२८७ रुपयात खरेदी करू शकता. जर १३ महिन्याचा प्लान निवड केला तर प्रति महिना ९९ रुपये द्यावा लागतो. वाचाः जे युजर्सं १२ महिन्यांसाठी Google Nest Hub घेत असतील त्यांना ११८८ रुपये द्यावे लागतील. याची वास्तविक किंमत ९९९९ रुपये आहे. यासाठी युजर्संना १९९ रुपये प्रति महिना १०.५ महिने, २०.५ महिने, आणि ३०.५ महिन्यासाठी द्यावे लागतील. यासाठी १९९९ रुपयांचा रिचार्ज एकत्र करावा लागणार आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BgWA2W