Full Width(True/False)

Flipkart Big Saving Days sale २५ जुलै पासून, स्मार्टफोन्स-Electronic डिव्हाइसेसवर मोठी सूट, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली. Flipkartतर्फे कायमच ग्राहकांसाठी विविध सेलचे आयोजन करण्यात येते. यावेळी देखील अशाच सेलचे आयोजन करण्यात आले असून हा सेल सर्वांसाठी २५ जुलै तर प्लसच्या सदस्यांसाठी २४ जुलै रोजी सकाळी १२ वाजता सुरु होईल. ई-टेलरने यापूर्वीच सेलची मायक्रोसाईट तयार केली आहे. ज्यात बँकेच्या ऑफर्स व इतर सवलतींबद्धल माहिती जाहीर करण्यात आली आहे. वाचा: Amazon Prime डे सेलशी सुसंगत असेल. Amazon चा वार्षिक सेल २६ जुलै ते २७ जुलै दरम्यान असेल. फ्लिपकार्टवरील आगामी विक्रीचा एक भाग म्हणून, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांवर खरेदीदारांना १० % त्वरित सूट मिळेल. ई-टेलरने २१ जुलै ते २३ जुलै या कालावधीत प्री-बुकिंग दिवसांची घोषणा देखील केली आहे. इच्छुकांना विक्रीदरम्यान गॅरंटीड स्टॉक मिळविण्यासाठी 1 Re ऍडव्हान्स रक्कम भरता येईल. फ्लिपकार्टवर नेहमीप्रमाणेच कपडे, किचन अप्लायन्सेस , इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस सोबत इतर बऱ्याच वस्तूंवर सूट देण्यात येईल. परंतु, स्मार्टफोनवरील डील्स यातील मुख्य आकर्षणांपैकी एक असेल. फ्लिपकार्ट Apple iPhone 12, Apple iPhone 12 Mini, iPhone Xr, Oppo Reno 6 Pro आणि अधिक अशा फ्लॅगशिपवर मोठी सूट देत आहे. Xiaomi MI 11 Lite, Vivo V21 आणि Samsung Galaxy F62 सारख्या मध्यम श्रेणी आणि बजेट श्रेणी फोनवर ऑफर देखील यात मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीज श्रेणतील उपकरणे सेलमध्ये ८० % सवलतीवर उपलब्ध असतील. फ्लिपकार्ट पेजवर उपलब्ध माहितीनुसार टीव्ही आणि उपकरणे ७५ % पर्यंत सवलतीत विकले जातील. सेलमध्ये क्रेझी डील्स ,रश अवर्स, टिकटॉक डील्स आणि इतर ऑफर देखील असतील. तसेच फ्लाइट बुकिंगवरही सूट मिळेल. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kLbXeb