मुंबई: बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये गणला जाणारा अभिनेता सध्या त्याचा आगामी चित्रपट ''च्या शूटिंगमध्ये बीझी आहे. आयुष्मानच्या या चित्रपटाची निर्मिती जंगली पिक्चर्स करत आहे. आयुष्मान खुरानानं या आधी जंगली पिक्चर्ससोबत २०१७ मध्ये 'बरेली की बर्फी' आणि २०१८ मध्ये 'बधाई हो' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता आयुष्मानचा 'डॉक्टर जी' चित्रपटातील फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'डॉक्टर जी'मध्ये तो पहिल्यांदाच अभिनेत्री राकुलप्रीत सिंग सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या कॅम्पस ड्रामा कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग सध्या भोपाळमध्ये सुरू असून या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. आता या चित्रपटातील आयुष्मानचा फर्स्ट लुक रिलीज झाला असून सध्या सोशल मीडियावर आयुष्मानच्या या फर्स्ट लुकचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. 'डॉक्टर जी' या चित्रपटाबाबत बोलताना आयुष्मान म्हणाला, 'हा चित्रपट माझ्यासाठी खूपच खास आहे. लॉकडाऊनचे नियम आणि बंधन पाहता या चित्रपटाचं शूटिंग लवकरात लवकर सुरू व्हावं असं आम्हाला वाटत होतं. अखेर ते सुरू झालंय. मी स्क्रिनवर पहिल्यांदाच डॉक्टरची भूमिका साकारत आहे. यातून मी पुन्हा एकदा विद्यार्थी होऊन हॉस्टेल लाइफच्या आठवणी अनुभवू शकतो.' आयुष्मान खुराना आणि राकुलप्रीत सिंह यांच्या व्यतिरिक्त 'डॉक्टर जी' या चित्रपटात शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारा आयुष्मान खुराना अखेरचा अमिताभ यांच्यासोबत 'गुलाबो सिताबो' या चित्रपटात दिसला होता. 'डॉक्टर जी' चित्रपटाच्या अगोदर आयुष्माननं त्याच्या 'चंडीगढ़ करे आशिकी' आणि 'अनेक' या चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zqtTPl