नवी दिल्ली : ची आजपासून (१२ जुले) विक्री सुरू होत आहे. ह्यूवाई बँड ६ हा Black, Sakura Pink Amber, Sunrise आणि Forest Green अशा चार रंगात येतो. या फिटनेस बँडला तुम्ही वरून ४,४९० रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये बँडच्या खरेदीवर १,९९० रुपयांचा Mini ब्लूटूथ स्मार्ट स्पीकर मोफत दिला जात आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. वाचाः Huawei Band 6 चे स्पेसिफिकेशन्स Huawei Band 6 हा १४ दिवसांच्या बॅटरी लाइफसह येतो. बँडला ५ मिनिटं चार्जिंग केल्यास २ दिवस वापरू शकता. हा कंपनीचा पहिला समार्ट बँड आहे, ज्यात १.४७ इंच एमोलेड फूल व्ह्यू डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा स्क्रिन टू बॉडी रेशियो ६४ टक्के आहे. स्क्रीन रिझॉल्यूशन १९४x३६८ आहे. फिटनेस बँड Huawei TrueSeen TM ४.० वर आधारित आहे. बँड पॉवर सेव्हिंग अल्गोरिद्मसोबत येईल. यात २४ तास SpO2 मॉनिटरिंग फीचर देण्यात आले आहे. अन्य फीचरमध्ये हार्ट रेट, स्पीड आणि स्ट्रेस मॉनिटरिंग सपोर्ट देखील मिळेल. बँडद्वारे ब्लड प्रेशर मोजता येईल. वाचाः ९६ वर्क मोड Huaweri Band 6 मध्ये ९६ वर्किंग मोड मिळतील. सोबतच, ११ प्रोफेशन मोड दिले जातील. यात इनडोर आणि आउटडोर रनिंग, सायकलिंग, रोप स्किपिंगचा समावेश आहे. यात ८५ कस्टम मोड्स आहेत. यामध्ये फिटनेस बॉल गेम्स देण्यात आले आहे. सोबतच, अन्य वर्कआउट ट्रॅकिंग मोड देखील मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AQ21W9