Full Width(True/False)

फक्त ५ रुपयात IIT-JEE आणि NEET चा कोर्स, असा घ्या या सुविधेचा लाभ

नवी दिल्ली : ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्म आणि टाटा स्कायने इंजिनिअर आणि मेडिकल वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेसची घोषणा केली आहे. याला त्यांनी JEE Prep आणि Tata Sky Prep असे नाव दिले आहे. आणि वेदांतूच्या भागीदारी अंतर्गत विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी फक्त दिवसाला ५ रुपयात ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म उपलब्ध केला जाणार आहे. वाचाः या प्लॅटफॉर्मवर नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची IIT, NEET, NTSE, Olympiads आणि अकरावी व बारावीच्या विद्याथ्यांची IIT JEE Main, JEE Advanced () आणि NEET (medical) ची तयारी करून घेतली जाईल. वेदांतूच्या शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांना शिकवले जाईल. हे क्लासेस इंग्लिश आणि हिंदीमध्ये घेतले जातील. ही सुविधा टाटा स्काय मोबाइल अ‍ॅपवर देखील उपलब्ध आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे रिव्हिजन, टेस्ट्स, क्लास नोट्स मिळतील. तसेच, विद्यार्थी रिपिट बॅचेसमध्ये देखील सहभागी होऊ शकतील. शिक्षकांना प्रश्न विचारण्याची सुविधा देखील मिळेल. परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने देखील इतर महत्त्वाच्या गोष्टी अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरवल्या जातील. वाचाः टाटा स्काय सबस्क्राइबर्सला Vedantu's Live लर्निंग प्रोग्राम्सवर स्पेशल डिस्काउंट देखील मिळेल. यात बारावी, सीबीएसई, ICSE, स्टेट बोर्ड आणि इतर स्पर्धा परीक्षांचा देखील समावेश असेल. सबस्क्राइबर्सला लाइव्ह क्लासेसची सुविधा देखील यांतर्गत मिळेल. या क्लासेसमध्ये क्विज देखील घेतले जाते. याची उत्तरे विद्यार्थी टीव्ही रिमोटद्वारे देऊ शकतील. नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी ४४० पेक्षा अधिक व्हिडीओ उपलब्ध असतील. तर ११वी आमि १२वीसाठी जुलै २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत २१००+ व्हिडीओ असतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2W1Ynsn