Full Width(True/False)

DSLR सारखा व्हिडिओ बनवणाऱ्या Oppo फोनची आजपासून विक्री, मिळवा ४ हजारांची सूट

नवी दिल्लीः ओप्पोने आपला जबरदस्त कॅमेराचा स्मार्टफोन ला गेल्या आठवड्यात भारतात लाँच केले होते. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये कॅमेरा प्रमाणे ब्लर बॅकग्राउंड व्हिडिओज बनवता येवू शकतो. लाँचिंग नंतर या फोनला प्री ऑर्डर केले जाऊ शकत होते. परंतु, या फोनला आजपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा, 4,500mAh ची बॅटरी, 65W फास्ट चार्जिंग आणि AMOLED डिस्प्ले सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः ४ हजारांचा इंस्टेंट डिस्काउंट ओप्पो रेनो ६ प्रो ५जी फोनला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट, ओप्पो ऑनलाइन स्टोर, रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा द्वारे खरेदी केले जावू शकते. फोनला फक्त एकाच व्हेरियंट मध्ये १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. या फोनची किंमत ३९ हजार ९९० रुपये आहे. फोनला दोन कलर ऑप्शन मध्ये ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक मध्ये आणले आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे HDFC, ICICI आणि Kotak बँकेच्या डेबिट व क्रेडिट कार्डवर ४ हजार रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट ऑफर केला जात आहे. वाचाः Oppo Reno 6 Pro 5G चे फीचर्स ओप्पो रेनो ६ प्रो ५जी फोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस कर्व्ड अमोलेड डिस्प्ले मिळतो. हे डिस्प्ले 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन आणि 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येते. यात १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. मीडियाटेक डाइमेंसिटी 1200 प्रोसेसर मिळतो. यात अल्ट्रा स्लिम डिजाइन आणि 3D बॉर्डरलेस सेंस स्क्रीन दिली आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी यात रियर मध्ये चार लेन्स दिले आहेत. यात रियर कॅमेरात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर, २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. फोन मध्ये Portrait Video चे फीचर दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/371M9lX