Full Width(True/False)

PUBG चाहत्यांची प्रतिक्षा संपली!, Battlegrounds Mobile India अधिकृतपणे लाँच

नवी दिल्लीः PUBG चाहत्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. Battlegrounds Mobile India (BGMI) ला अधिकृतपणे आज लाँच करण्यात आले आहे. आता या गेमला तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. वाचाः असे खेळू शकता Battlegrounds Mobile India (BGMI) चा ज्या लोकांना फार उत्सूकता होती. त्यांच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे. याला डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Google Play Store वर जावे लागेल. त्यानंतर Battlegrounds Mobile India वर जाऊन सर्च करावे लागेल. सर्च रिझल्ट मध्ये Battlegrounds Mobile India ला आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. जर तुम्ही या गेमचे अर्ली व्हर्जन सुद्धा इन्सॉल केलेले असेल तर तुम्ही प्ले स्टोर वर जाऊन त्याला अपडेट करू शकता. तुम्ही याच्या बीटा व्हर्जनवर जाऊ शकता. याला डाउनलोड करण्यासाठी चांगली इंटरनेट कनेक्टिविटी असायला हवी. कंपनीने म्हटले की, इंडियाचा बॅटलग्राउंड गिफ्ट १ मिलियन आणि ५ मिलियन डाउनलोड रिवॉर्डला १९ ऑगस्ट पर्यंत वाढवले आहे. वाचाः हे झालेत बदल क्राफ्टन ने PUBG Mobile मध्ये काही बदल करून Battlegrounds Mobile India या नावाने लाँच केले आहे. यात जवळपास सर्व गेम प्ले, मॅप्स, व्हीकल, शस्त्र आदी मिळते. क्राफ्टनने यात नवीन कॉस्मेटिक जोडले आहेत. यासोबतच गेममध्ये कोणाला मारण्यासाठी लाल रंगाऐवजी हिरवा रंग दाखवला आहे. कॅरेक्टर्सला पूर्ण कपडे घातले आहे. क्राफ्टन सेफ प्ले ला प्रमोट करीत आहे. लोकांना गेम खेळण्यासाठी ब्रेक घेण्यासाठी अपील करता येऊ शकतो. वाचाः मॅप्स मध्ये गेम डेव्हलपरने कोणतेही स्पेशल नावाचा खुलासा केला नाही. असे अनेक टीझर आहेत. जे कमीत कमी तीन सर्वात लोकप्रिय मॅप्स दाखवतात. ज्यात एरंगेल, सनहोक आणि मिरामारचा समावेश आहे. Google Play Store वर गेमच्या डिस्क्रिप्शन पेजचा दावा आहे की, गेम मध्ये वर्चुअल सेटिंग वर विविध परिसरातील वेगवेगळे मॅप्स असतील. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dDuLY6