नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी एकच गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे लसीकरण. महतत्वाचे झाले आहे. काही ठिकाणी आणि कोरोना टेस्ट रिपोर्ट दाखवणे अनिवार्य केले आहे. आता यासाठी एक खास फीचर आणण्याच्या तयारीत असून, याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमध्येच तुमचे डिजिटल वॅक्सिनेशन कार्ड आणि कोरोना टेस्ट रिपोर्ट सेव्ह करू शकता. वाचा : फीचरवर काम सुरू गुगलने या फीचरवर काम सुरू केलं आहे. हे फीचर्स रोलआउट झाल्यानंतर अँड्राइड यूजर्स वॅक्सिनेशन कार्ड अथवा अन्य कोरोनासंबंधित रिपोर्ट फोनमध्ये स्टोर करू शकतील. यासोबत यूजर्स या कागदपत्रांचा शॉर्टकट तयार करू शकतील व फोनच्या होम स्क्रीनवर सेव्ह करू शकतात. गुगलच्या या फीचरद्वारे हेल्थकेअर ऑर्गनाइझेशन, सरकारी संस्था आणि पब्लिक हेल्थ अथॉरिटीजला परवानगी दिली जाते की, लसीकरणाचे सर्टिफिकिट आणि चाचणीचे डिजिटल व्हर्जन बनवून स्मार्टफोन्समध्ये सेव्ह करता येईल. लसीकरणाच्या बाबतीत हे सर्टिफिकिट तुम्ही कधी व कोणता डोस घेतला आहे याची माहिती दर्शवते. हेल्थकेअर प्रोवाइडर अॅप अथवा वेबसाइटद्वारे हे सर्टिफिकेट दिल्यानंतर फोनमध्ये सेव्ह करू शकता. वाचा : या व्यतिरिक्त या कागदपत्रांना विना इंटरनेटचे देखील अॅक्सेस करू शकता. तसेच, हे फीचर वापरण्यासाठी अँड्राइड व्हर्जन कमीत कमी ५ असणे आवश्यक असल्याचे गुगलने म्हटले आहे. या देशात सर्वात आधी उपलब्ध होणार फीचर गुगलने माहिती दिली की, हे अँड्राइड फीचर सर्वात आधी अमेरिकेत लाँच होईल व त्यानंतर इतर देशात लाँच केले जाईल. मात्र, हे फीचर कधी येईल, याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. वाचा : वाचा : वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SN0a3m