नवी दिल्ली : इंस्टंट व्हॉट्सअॅपने भारतात आपला पहिला मासिक अहवाल सादर केला आहे. सरकारने आणलेल्या नवीन आयटी नियमांतर्गत टेक कंपन्यांना हा अहवाल सादर करणे गरजेचे आहे. या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपने १५ मे ते १५ जून २०२१ दरम्यान तब्बल २० लाख अकाउंट्सवर बंदी घातली आहे. वाचा: का बंद केले अकाउंट ? कंपनीनुसार, जवळपास ९५ टक्के अकाउट्स अनाधिकृत ऑटोमेटेड, बल्क मेसेजिंग किंवा स्पॅम करत असल्याने बंद करण्यात आले . जगभरात हा आकडा ८० लाख आहे. बंदी घालणाऱ्या अकाउंट्समध्ये वाढ कंपनीनुसार, २०१९ मध्ये सिस्टम अधिक आधुनिक आणि बल्क किंवा ऑटोमॅटेड मेसेज करणारे अकाउंट्स शोधत असल्याने दर महिन्याला बंद करण्यात येत असलेल्या अकाउंट्समध्ये मोठी वाढ झाली आहे. WhatsApp अकाउंट्सकडून कोणत्या तक्रारी ? कंपनीकडे १५ मे ते १५ जूनपर्यंत ३४५ तक्रारी आल्या. यातील ७० अकाउंट सपोर्ट, २०४ बॅन अपिल, ८ सिक्योरिटी संदर्भात, ४३ प्रोडक्ट सपोर्ट आणि २० अशा तक्रारी होत्या ज्यांचा खुलासा करता येणार नाही. यातील ६३ अकाउंट्सच्या बंदीच्या तक्रारीवर कंपनीने कारवाई केली. WhatsApp ने अहवालात काय म्हटले आहे ? कंपनीने आपल्या मासिक अहवालात म्हटले आहे की, एखादी हिंसक घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी ती घटना घडण्याआधी ते थांबणे यावर आमचे विशेष लक्ष आहे. WhatsApp account abuse अकाउंट गैरवर्तन शोधण्याचे काम तीन टप्प्यावर होते. एक रजिस्ट्रेशन, मेसेजिंग आणि नेगेटिव्ह फीड. यूजर रिपोर्ट्स आणि ब्लॉक्सकडून याबाबत कंपनीला माहिती मिळते. यानंतर टीम याचे विश्लेषण करत सुधारणा करण्याचे काम करते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3hHcUSt