Full Width(True/False)

Xiaomi Mi 11 Lite स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पाहा ऑफर, किंमत आणि फीचर्स

नवी दिल्लीः Mi 11 Lite Offer Smartphone under 20000: हँडसेट निर्माता कंपनी शाओमीने गेल्या महिन्यात आपला सर्वात स्लीम आणि हलका स्मार्टफोन खूपच कमी किंमतीत पॉवरफुल फीचर्स सह लाँच केला होता. या हँडसेट सोबत मिळत असलेल्या ऑफर संबंधी माहिती आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः मिड रेंज सेगमेंट मध्ये येणाऱ्या Mi 11 Lite मध्ये स्पीड आणि मल्टिटास्कींगसाठी Snapdragon 732G SoC आणि ४२५० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत. जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर जाणून घ्या डिटेल्स. या फोनवर कोणती ऑफर दिली जात आहे. वाचाः Xiaomi Mi 11 Lite चे फीचर्स या फोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०.९, फोनध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट सोबत येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी ऑक्टो कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जी एसओसीचा वापर करण्यात आला आहे. सोबत ग्राफिक्ससाठी अड्रेनो ६१८ जीपीयू दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहेत. ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. वाचाः फोनध्ये कनेक्टिविटीसाठी वाय फाय ८०२.११ एसी 4G LTE, ब्लूटूथ, इन्फ्रारेड,यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. जीपीएस ए जीपीएस सारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी 4250mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. Mi 11 Lite च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. शाओमीच्या वेबसाइटवर मी डॉट कॉमवर आता या फोनवर एक जबरदस्त बँक ऑफर लिस्ट आहे. या ऑफर नुसार, एसबीआय बँक क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनचा वापर केल्यास १५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xQRgB8