Full Width(True/False)

थेट राडा होणार! वाचा 'बिग बॉस मराठी ३' मधील स्पर्धकांची नावं

मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम '' चा तिसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच कार्यक्रमाचे काही प्रोमो वाहिनीकडून प्रदर्शित करण्यात आले आहेत. प्रोमो पाहून प्रेक्षक कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस मराठी' १९ सप्टेंबरपासून रात्री ९. ३० वाजता प्रसारित होणार आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकाच घरात तब्बल ९० दिवस राहण्यासाठी येतात. काहींची एकमेकांसोबत गट्टी जमते तर काही एकमेकांचे कट्टर वैरी होतात. ९० दिवस कार्यक्रमात टिकून राहण्याचं आव्हान सहभागी होणाऱ्या प्रयेक कलाकारासमोर असतं. त्यातही बिग बॉसची आज्ञा पाळत त्यांनी दिलेले टास्क इमाने इतबारे पूर्ण करत स्वतःला सिद्ध करून दाखवायची चुरस या सगळ्याच सदस्यांमध्ये असते. या स्पर्धेत एकमेकांना साथ देत टिकून राहायचं की स्वतःचा मार्ग निवडत एकट्याने खिंड लढवायची हे ज्याचं त्याने ठरवायचं असलं तरीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक कलाकारांचे स्वभाव प्रेक्षकांसमोर येत असतात. कलाकार इतरांना देत असलेल्या वागणुकीवरही प्रेक्षक त्यांना मतं देत असतात. मागील दोन सिजनमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकून घेत स्पर्धकांनी घरातील त्यांचं स्थान कायम केलं होतं. यावेळेस कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक कसा खेळ खेळणार हे लवकरच कळेल. 'बिग बॉस मराठी' सीजन तीनमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कलाकारांना विचारणा करण्यात आली होती. ही आहेत खेळात सहभागी होणाऱ्या काही संभाव्य स्पर्धकांची नावं. इथे वाचा संभाव्य यादी- १. आनंद इंगळे २. कमलाकर सातपुते ३. अंशुमन विचारे ४. प्रणित हाटे ५. पल्लवी पाटील ६. नेहा जोशी ७. पल्लवी सुभाष ८. भाग्यश्री लिमये ९. नक्षत्रा मेढेकर १०. खुशबू तावडे ११. १२. रुपल नंद १३. संग्राम समेळ १४. १५. चिन्मय उदगीरकर


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3juzmQ1