Full Width(True/False)

तुमच्या स्मार्टफोनमध्ये नसतील लगेच डाउनलोड करा हे पाच Government Apps, येतील खूप कामी, पाहा लिस्ट

भारताची वाटचाल आता डिजिटल व्यवहारांकडे सुरु आहे. गेल्या काही काळात देशात मोठ्या प्रमाणात डिजिटलायजेशन झाले आहे. भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत मोठ्या प्रमाणात अॅप्स लाँच केले आहेत. या मोबाईल अॅप्सद्वारे लोकांना अत्यावश्यक सेवा दिल्या जात आहेत. हे सर्व सरकारी मोबाईल अॅप्स बद्दल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील. सरकार तर्फे कायमच स्मार्टफोन यूजर्ससाठी वेळोवेळी अपडेटेड मोबाइल ॲप्स उपलब्ध करण्यात येतात. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून हे सुरक्षित अॅप्स संचलित केले जातात. सध्याचे सायबर गुन्हे बघता असुरक्षित ॲपचा टाळणे कधीही चांगलेच. शिवाय, अधिकृत आणि सुरक्षित 'अॅप' चा वापर करणे करणे गरजेचे आणि महत्वाचे आहे, असेच काही आवश्यक ॲप्स आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. जे तुमच्या स्मार्टफोनमध्ये असायलाच हवे. या मध्ये उमंग, मायगव्ह, एमआधार सारख्या काही महत्वाच्या Apps चा समावेश आहे.

M addhar
M addhar

महत्त्वाच्या आधार कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी 'एम-आधार' नावाचे ॲप सरकारने तयार केले आहे. mAadhaar एक उत्तम मोबाईल अॅप आहे. युजर्स या अॅपद्वारे त्यांच्या आधार कार्डची सॉफ्ट कॉपी बनवू शकतात. याशिवाय, आधार कार्डमधील नाव आणि पत्ता यासारखी माहितीही अॅपद्वारे दुरुस्त केली जाऊ शकते. या ॲपद्वारे संबंधित यूजर आपली ई-केवायसी करू शकतो. प्रत्येकाने वापरावे असे हे एक अतिशय महत्वाचे आणि उपयुक्त App आहे.

Umang
Umang

उमंग हे एक अतिशय उपयुक्त मोबाइल अॅप आहे. युनिफाइड मोबाइल ॲप्लिकेशन फॉर न्यू गव्हर्नन्स' म्हणजेच 'उमंग' असे ॲपचे शॉर्टफॉर्म आहे. या मोबाईल अॅपमध्ये युजर्सना कर्मचारी भविष्य निधी, पॅन, आधार, डिजीलॉकर, गॅस बुकिंग, मोबाईल बिल पेमेंट आणि वीज बिल पेमेंट या सेवा मिळतील. हे उमंग मोबाईल अॅप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय ई-शासन विभाग यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.

My Gov
My Gov

My Gov हे अॅप ॲप आपल्याला सरकारच्या विविध कार्यक्रमांशी जोडते . हे अँप Google Play Store आणि Apple App Store वरून डाउनलोड करता येते. युजर्स या अॅपद्वारे विभाग आणि मंत्रालयांना सूचना देऊ शकतात. या व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना अॅपमध्ये विभागांशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळते .यूजर्स केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यातून मिळवू शकतात. प्रत्येक भारतीयासाठी My Gov हे खूप उपयुक्त असे ॲप आहे.

Aarogya Setu
Aarogya Setu

आरोग्य सेतू मोबाईल अॅप सध्या प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये असेल. आरोग्य सेतू मोबाईल अॅप कोरोना विषाणूचा वाढता प्रसार लक्षात घेऊन तयार करण्यात आले. आरोग्य सेतू मोबाईल अॅप कोरोना बाधित लोकांचे स्थान ओळखते आणि त्याच्या युजरला संक्रमित लोकांच्या संपर्कात येण्याविषयी माहिती देते. यासह, मोबाईल अॅप कोरोना लसीशी संबंधित प्रत्येक प्रकारची माहिती अॅपमध्ये उपलब्ध आहे. आता आरोग्य सेतु अॅप मध्ये अनेक फीचर्स जोडले गेले आहेत.

DigiLocker
DigiLocker

डिजीलॉकर ही क्लाउड आधारित सेवा आहे. या अॅपमध्ये प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट सारखी कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवली जाऊ शकतात. हे एक सुरक्षित ऑनलाइन स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे. यात आपण आपल्या कायदेशीर कागदपत्रांची स्कॅन केलेली एक प्रत १ जीबी पर्यंत अपलोड करू शकता. हे App इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येते.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jjcqmA