नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या ने रेल्वे प्रवाशांसाठी विशेष सेवा सुरू केली आहे. यानुसार आता रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकीट रद्द केल्यानंतर Refund साठी दोन-तीन दिवस वाट पाहावी लागणार नाही. नवीन प्रणाली अंतर्गत, जर एखाद्या प्रवाशाने IRCTC च्या वेबसाइटवर रेल्वेचे तिकीट रद्द केले, तर परतावा त्याच्या खात्यात त्वरित जमा केला जाईल. वाचा: लक्षात घेण्यासाखी गोष्ट म्हणजे, जर प्रवाशांनी आणि वेबसाइट दोन्हीद्वारे खरेदी केलेली तिकिटे रद्द केली तरच त्यांना ही सुविधा मिळेल. आयआरसीटीसीच्या या अॅपचे नाव i-pay आहे. पेमेंट गेटवे वरून तिकीट खरेदी केल्यानंतर रद्द केल्यास तुम्हाला रिफंडची वाट पाहावी लागणार नाही. या अॅपवरून तिकिट कसे बुक करायचे ते जाणून घ्या: IRCTC iPay द्वारे रेल्वे तिकिट कसे बुक करावे ?
- iPay द्वारे बुकिंग करण्यासाठी, प्रथम www.irctc.co.in वर लॉग इन करावे लागेल.
- लॉग इन केल्यानंतर तुमचा प्रवास तपशील जसे ठिकाण आणि तारीख भरा.
- यानंतर, तुमच्या मार्गानुसार ट्रेन निवडा. तिकीट बुक करताना तुम्हाला पेमेंट पद्धतीमध्ये पहिला पर्याय 'IRCTC iPay' मिळेल.
- हा पर्याय निवडा आणि 'पे अँड बुक' वर क्लिक करा. आता पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा यूपीआय तपशील भरा.
- यानंतर तुमचे तिकीट त्वरित बुक केले जाईल, ज्याचे कन्फर्मेशन तुम्हाला SMS आणि ईमेल द्वारे मिळेल.
- यानंतर, जर तुम्ही भविष्यात पुन्हा तिकीट बुक केले, तर तुम्हाला पुन्हा पेमेंट तपशील भरावा लागणार नाही, तुम्ही लगेच पैसे देऊन तिकीट बुक करू शकाल.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zoJ0sP