नवी दिल्लीः आधी स्मार्टफोनमध्ये बेस्ट कॅमेरा स्मार्टफोनला मोठी मागणी होती. परंतु, आता युजर्संकडून स्मार्टफोनमध्ये बेस्ट कॅमेरा सोबत दमदार बॅटरी असलेल्या स्मार्टफोनला मागणी आहे. ऑनलाइन गेमिंग, व्हिडिओ स्ट्रिमिंग आणि अनेक सारे ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे युजर्संना मोठ्या बॅटरीचे स्मार्टफोन्स आवडू लागले आहेत. हेवी बॅटरीच्या स्मार्टफोन्समध्ये युजर्संना नॉन स्टॉप गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रिमिंगची मजा घेण्यासाठी वारंवार चार्जिंग करावे लागत नाही. जर तुम्हाला एक हेवी ड्युटी बॅटरीचा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला हा फोन शोधण्यात मदत करणार आहोत. या ठिकाणी काही असे दमदार हँडसेट्स संबंधी माहिती देत आहोत. ज्यात फास्ट चार्जिंग सपोर्ट 7000mAh ची बॅटरी मिळते. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या स्मार्टफोनमध्ये मोठ्या बॅटरी शिवाय, जबरदस्त फीचर्स दिले आहेत. सॅमसंग गॅलेक्सी F62 सॅमसंगच्या या फोनमध्ये कंपनी 7000mAh ची बॅटरी ऑफर करीत आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज सोबत या फोनमध्ये Exynos 9 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १२ मेगापिक्सलचा आणि दोन ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा या फोनमध्ये दिला असून फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले ऑफर केला आहे. टेक्नो पोवा २ टेक्नोचा हा बजेट स्मार्टफोन 7000mAh च्या बॅटरी सोबत येतो. फ्लॅश चार्जिंग दिले आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. प्रोसेसर म्हणून कंपनीने या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G85 ऑफर केली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये ६.९५ इंचाचा IPS LCD पॅनेल दिला आहे. सॅमसंग गॅलेक्सी M51 ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 7000mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६.७ इंचाच्या डिस्प्ले सोबत ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा रियर सेटअप दिला आहे. फोनमध्ये सेल्फी कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा दिला आहे. फोन स्नॅपड्रॅगन 730G चिपसेट वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WOeQkf