मुंबई- आपल्या अभिनयाने साता समुद्रापार नाव कमावणारी बॉलिवूड अभिनेत्री हिच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली होती. प्रियांकाने २०१८ साली हॉलिवूड अभिनेता आणि गायक निक जोनास याच्यासोबत लग्नगाठ बांधली. प्रियांका- निकच्या लग्नातील राजेशाही थाट पाहून सगळ्यांचेच डोळे दिपले होते. मग तो प्रियांकाने घातलेला लेहेंगा असो किंवा केसात माळलेलं गुलाबाचं फुल असो, सगळ्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. परंतु, या राजेशाही लग्नाचा खर्च नेमका केला तरी कुणी? प्रियांकाने स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. प्रियांका आणि निक यांनी उदयपूरमधील आलिशान पॅलेसमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नासाठी कुटुंबियांसोबत काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. एका इटालियन ब्रॅण्डच्या पत्रकार परिषदेत प्रियांकाला तिच्या लग्नासंबंधित प्रश्न विचारण्यात आला. प्रियांकाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका- आणि निक यांच्या लग्नात झालेला खर्च कुणीही एकाने केलेला नव्हता. तर वधू आणि वर पक्षाने मिळून हा खर्च केला होता. प्रियांका आणि निक यांनी मिळून लग्नातील प्रत्येक वस्तूचा खर्च केला. प्रियांकानुसार, फक्त एक वस्तू होती जिचा खर्च निकने केला होता. ती वस्तू म्हणजे निकने प्रियांकासाठी आणलेली अंगठी. ही अंगठी निकने खास प्रियांकासाठी आणली होती. सोबतच प्रियांकाने लग्न करणाऱ्या जोडप्यांना सल्लाही दिला आहे. प्रियांकाच्या सांगण्यानुसार, जोडप्यांनी लग्नाच्या तयारीपासूनच जबाबदारी वाटून घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मग त्यात कपड्यांच्या खरेदीसोबत बरंच काही येतं. प्रियांका आणि निकच्या लग्नाला आता दोन वर्ष झाली आहेत. ते दोघेही एकमेकांसोबतचे मजेशीर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. प्रियांका लवकरच 'जी ले जरा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2WVFuba