Full Width(True/False)

नवीन डिझाईन आणि A15 बायोनिक चिपसेटसह iPad Mini लाँच, फीचर्स एकापेक्षा एक, पाहा किंमत

नवी दिल्ली: ने आपल्या इव्हेंट दरम्यान देखील लाँच केला असून डिव्हाइस अँड्रॉइड टॅब्लेटच्या तुलनेत ६ पट वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ९ चा सेल्फी कॅमेरा सुधारण्यात आला आहे. हे डिव्हाइस अॅपलच्या सेंटर स्टेज वैशिष्ट्याने सुसज्ज आहे. हे वैशिष्ट्य प्रथम आयपॅड प्रो मध्ये उपलब्ध करण्यात आले होते. नवीन आयपॅड Apple पेन्सिलला देखील सपोर्ट करतो. तसेच, Ipad नवीन डिझाइनसह सादर करण्यात आला असून त्यात पॉवर बटणाच्या आत टच आयडी एम्बेडेड आहे. जे 5G सपोर्टसह येते. वाचा: New iPad, iPad mini किंमत आणि उपलब्धता: भारतात New iPad ची किंमत ३०,९०० रुपयांपासून सुरू होते. ही त्याच्या वाय-फाय मॉडेलची किंमत आहे. तर, त्याच्या वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत ४२,९०० रुपये आहे. आयपॅड स्पेस ग्रे आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. नवीन iPad मिनीची सुरुवातीची किंमत ४६,९०० रुपये आहे. ही त्याच्या वाय-फाय मॉडेलची किंमत असून त्याच्या वाय-फाय आणि सेल्युलर मॉडेलची किंमत ६०, ९०० रुपये आहे. हे डिव्हाइस ब्लॅक, व्हाईट, डार्क चेरी, इंग्लिश लॅव्हेंडर आणि ऑरेंज रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून त्यांच्या उपलब्धतेची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. New iPad: वैशिष्ट्ये New iPad १०.२ इंच डिस्प्लेसह येतो. यात ट्रू टोन सपोर्ट आहे जो सभोवतालच्या प्रकाशानुसार स्क्रीन रंग तापमान ऍडजेस्ट करतो. हे A13 बायोनिक चिपसह येत असून यात न्यूरल इंजिन देखील दिले गेले आहे. जे, कार्यप्रदर्शन सुधारते. यात नवीन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच, यात १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेराही यात आहे. आयपॅडच्या होम बटणात टच आयडी देण्यात आला असून आयपॅड मिनी स्मार्ट कीबोर्ड आणि प्रथम पिढी, Apple पेन्सिलला समर्थन देते. यासह, तृतीय-पक्ष कीबोर्ड समर्थन प्रदान केले गेले आहे. हे iPadOS 15 वर काम करते. हे डिव्हाइस फक्त वाय-फाय आणि वाय-फाय + 4 जी कनेक्टिव्हिटीसह येते. New iPad Mini : वैशिष्ट्ये iPad Mini ८.३ इंच लिक्विड रेटिना डिस्प्लेसह येतो. त्यात A15 बायोनिक चिप देण्यात आली आहे. हे डिव्हाईस ८० टक्के जलद कामगिरी प्रदान करते. नवीन iPad मिनी १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड फ्रंट कॅमेरासह येत असून १२ मेगापिक्सेलच्या मागील कॅमेराने सुसज्ज आहे. हे ट्रू टोन फ्लॅशला सपोर्ट करते. हे स्मार्ट एचडीआरसह ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंगला देखील समर्थन देते. यात स्टीरिओ स्पीकर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, वाय-फाय 6, ब्लूटूथ आणि यूएसबी-सी सारखी वैशिष्ट्ये प्रदान केली गेली आहेत. तसेच, ई -सिम सपोर्ट देखील त्यात आहे. डिव्हाइस दुसऱ्या पिढीच्या Apple पेन्सिलला सपोर्ट करते. यात iPadOS 15 असून हे एकाच चार्जवर संपूर्ण दिवस टिकू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3k9881y