नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी एअरटेल () ने यूजर्ससाठी नवीन प्लान लाँच केला आहे. एअरटेलचा हा नवीन प्लान एक डेटा पॅक आहे. याची किंमत ११९ रुपये आहे. प्रीपेड मोबाइल युजर्ससाठी लाँच करण्यात आलेल्या या पॅकचे नाव Xstream Mobile Pack आहे. या डेटा पॅक मध्ये कंपनी इंटरनेट युज करण्यासाठी १५ जीबी डेटा ऑफर करीत आहे. हा प्लान युजरला रनिंग प्लानची वैधतेपर्यंत किंवा १५ जीबी डेटा संपेपर्यंत आहे. एअरटेल थँक्स अॅपवरून करावे लागेल सब्सक्राइब या पॅकचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात युजर्संना ३० दिवसासाठी एअरटेल एक्स्ट्रीम अॅपवरून तीन पैकी एक ओटीटी चॅनलचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. युजर एअरटेलच्या या डेटा पॅकला एअरटेल थँक्स अॅपवर जाऊन सब्सक्राइब करू शकता. डेटा पॅक वरून नंबर रिचार्ज होताच अकाउंट मध्ये १५ जीबी डेटा क्रेडिट केले जाईल. ३० दिवसाच्या आत करावे लागणार सब्सक्राइब डेटा क्रेडिट झाल्यानंतर युजर्संना ३० दिवसांची वेळ दिली जाईल. ज्यात ते इरॉज नाउ (हिंदी), मनोरमा मॅक्स (मल्याळम), किंवा Hoichoi (बंगाली) पैकी एक ओटीटी चॅनलला सिलेक्ट करू शकता. पसंतीच्या ओटीटी चॅनेलला अँड्रॉयड किंवा iOS डिव्हाइसेवर एअरटेल एक्सट्रिम अॅपमध्ये जावून सब्सक्राइब करावे लागेल. प्लान आणि ओटीटी अॅपची वेगळी वैधता जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने एअरटेल एक्स्ट्रीम अॅप मध्ये या ओटीटी चॅनेलला सब्सक्राइब केले तर तुम्हाला इरॉज नाउ साठी ३९ रुपये, मनोरमा मॅक्स साठी ९९ रुपये, आणि Hoichoi साठी १९९ रुपये द्यावे लागतील. त्यामुळे ११९ रुपयाच्या पॅकमध्ये यातील एक सब्सक्रिप्शन मिळणार असेल तर फायदा आहे. या प्लानचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे वैधता आणि ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शन वैधता दुसऱ्यापेक्षा वेगळे आहे. ओटीटी अॅपची मंथली वैधता सब्सक्रिप्शन डेट मोजली जाणार आहे. १८० दिवसांपर्यंत वाढू शकता सब्सक्रिप्शन जर तुम्ही ११९ रुपयाचे अनेक रिचार्ज करीत असाल तर तुम्हाला मल्टिपल ओटीटी अॅप सिलेक्ट करण्याचा ऑप्शन मिळू शकतो. याशिवाय, तुम्ही सिलेक्ट केलेल्या एक ओटीटी अॅपचे सब्सक्रिप्शनला ३० दिवस ते १८० दिवसांपर्यंत वाढवू शकता. १९९ रुपयाच्या पॅक मध्ये ओटीटी बेनिफिटचा फायदा एअरटेल एक्स्ट्रिम अॅपमध्ये घेता येवू शकतो. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BWgek0