Full Width(True/False)

Apple iPad ला टक्कर देण्यासाठी येतोय Realme Pad, 'या' दिवशी भारतात होणार लाँच

नवी दिल्लीः Realme चा मेगा लाँचिंग इव्हेंट ९ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता आयोजित केला आहे. याचा खुलासा Flipkartच्या लिस्टिंगवरून झाला आहे. Realme च्या लाइव्ह इव्हेंटला कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube, Facebook वरून पाहिले जावू शकते. या इव्हेंटमध्ये Realme चे दोन शानदार स्मार्टफोन Realme 8s 5G आणि Realme 8i ला लाँच केले जाणार आहे. तसेच पहिल्यांदा Realme कंपनी आपला टॅबलेट लाँच करणार आहे. हा रियलमीचा पहिला हाय परफॉर्मेंस Pad आहे. जो अल्ट्रा थिन आणि लाइटवेट डिझाइन मध्ये येणार आहे. Realme कडून नुकताच पहिला लॅपटॉप Realme Book (Slim) लाँच करण्यात आला आहे. Realme Pad चे स्पेसिफिकेशन्स Realme Pad एक स्लिम आणि लाइवटेड टेबलेट आहे. रियलमीच्या या टॅबलेटची थिकनेस फक्त 6.9mm आहे. परंतु, याचा खुलासा करण्यात आला नाही. यात १०.४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जावू शकतो. याच्या किनाऱ्यावर हलके बेजल्स मिळतील. Realme टॅबलेट मध्ये MediaTek Helio G80 SoC चिपसेटचा सपोर्ट दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी Realme Pad च्या रियर वर पॅनेलवर 8MP चा कॅमेरा दिला जावू शकतो. सोबत एक फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. टॅबलेटच्या खालच्या भागात दोन स्पीकर दिले जाणार आहे. सोबत टॅब USB Type-C पोर्ट आणि दोन अन्य मायक्रो स्पीकर दिले जातील. Realme Pad मध्ये 7,000mAh ची एक बॅटरी दिली जावू शकते. टॅबलेट ६ जीबी रॅम आणि 64GB स्टोरेज ऑप्शन मध्ये येईल. सोबत दोन टॅब मॉडल WiFI-Only आणि LTE मध्ये येईल. वर्क फ्रॉम होममध्ये येईल कामाला हे ई-लर्निंग आणि वर्क फ्रॉम होम दरम्यान काम करण्यासाठी खास मदतशीर होईल. यात एक फुल स्केल ऑडियो व्हिज्युअल एक्सपीरियन्स मिळेल. Realme Pad मध्ये सिनेमॅटिक लेवल, टॉप नॉच साउंड क्वॉलिटी आणि शानदार स्क्रीन सोबत येईल. यात एक मोठी बॅटरीचा सपोर्ट दिला जाणार आहे. सोबत Realme Pad क्विक चार्जिंग सपोर्ट सोबत येईल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BHPzHN