Full Width(True/False)

WhatsApp युजर्स तयार राहा ! लवकरच येणार 'हे' भन्नाट Feature, पाहा तुमच्या किती कामी येणार

नवी दिल्ली: WhatsAppवर नेहमीच अनेक एकापेक्षा एक मस्त फीचर्स अपडेट होत असतात. ज्यामुळे युजर्सना चॅट्सचा अधिक चांगला अनुभव घेता येतो. आता देखील नवीन Disappearing Chats वैशिष्ट्यावर काम करत आहे. नुसार Disappearing Chats व्हॉट्सअॅपवरील वन-ऑन-वन चॅट आणि ग्रुपसाठी उपलब्ध असेल. हे फीचर लवकरच तुमच्या व्हॉट्सअॅपवर दिसू शकते. जाणून घेऊया या वैशिष्ट्याबद्दल. वाचा: Facebook चे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि WhatsApp प्रमुख विल कॅथकार्ट या दोघांनी हे वैशिष्ट्य लवकरच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याचे कन्फर्म केले आहे. असे WaBetaInfo तर्फे आधी सांगण्यात आले होते. सध्या हे फीचर WhatsApp बीटा आवृत्ती २.२१.१८.७ मध्ये असून प्रथम अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध होईल. काय विशेष असेल आगामी वैशिष्ट्य "स्वयंचलितपणे नवीन चॅट थ्रेड्स अल्पायुषी Chats मध्ये रूपांतरित करेल." जेव्हा तुम्ही ते एनेबल कराल तेव्हा ते गोपनीयता सेटिंग्जमध्ये मिळेल. प्रत्येक नवीन चॅट किंवा ग्रुपमधील सर्व मेसेज काही कालावधीनंतर अदृश्य होतील. जर एखाद्याला त्यांचे हे मेसेज डिलीट करायचे असतील, तर त्यांना गायब होणारे चॅट वैशिष्ट्य बंद करावे लागेल. प्राप्त माहितीनुसार नवीन चॅटमध्ये गायब होणारा मेसेज मोड एनेबल झाल्यावर व्हॉट्सअॅप युजर्सना सूचना मिळेल. व्हॉट्सअॅपचे व्ह्यू वन्स फीचर सध्या, व्हॉट्सअॅपवर डिसअपीयरिंग मेसेज आणि व्ह्यू वन्स फीचर आहेत. व्ह्यू वन्स फीचर तुम्हाला फोटो पाठवण्याची सुविधा देते जे रिसीव्हरने चॅट उघडल्यावर आणि चॅट बंद केल्यावर अदृश्य होतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jG7dW3