Full Width(True/False)

Apple Watch Series 7: IP6X सर्टीफिकेशन असणारी पहिली Apple Watch लाँच,वॉचमध्ये सर्व लेटेस्ट फीचर्स, पाहा किंमत

नवी दिल्ली : अॅपल इव्हेंट 2021 ' मध्ये लाँच करण्यात आली असून IP6X प्रमाणपत्र मिळवणारे ही पहिलीच Apple वॉच आहे . नवीन Apple Watch Series 7 वॉच ओएस 8 च्या अपडेट्सह सुरू होते. डिव्हाइ ईबाईक्सला देखील समर्थन देते. अपेक्षेप्रमाणे, Watch सीरीज 7 मध्ये पूर्णपणे नवीन डिस्प्ले आहे. त्याचा नवीन रेटिना डिस्प्ले वॉच सीरीज ६ पेक्षा २० टक्क्यांनी मोठा आहे. काठ ४० टक्के पातळ आहेत आणि सहज ऍक्सेसाठी बटणे मोठी आहेत. डिस्प्ले नवीन आणि उजळ आहे. स्क्रीन खूप जास्त मजकूर दाखवू शकते. Series 7 मोठ्या स्क्रीनला पूर्ण कीबोर्डचे समर्थन करते. तसेच, Apple Watch Series 7 मध्ये जलद चार्जिंग असून वॉच हे पाच नवीन अॅल्युमिनियम रंगांमध्ये येईल. वाचा: Apple Watch Series 7 ची वैशिष्ट्ये यात नवीन वॉच फेस असून IP6X प्रमाणपत्रासह पहिले Apple वॉच आहे. फास्ट चार्ज यूएसबी टाइप-सी केबलसह सीरीज ६ पेक्षा ३३ टक्के वेगाने चार्ज करते. घड्याळ पाच नवीन रंगात उपलब्ध असेल. Apple Watch Series 7 चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवीन डिस्प्ले. Apple Watch Series 7 ची किंमत Apple Watch Series 7 ची किंमत $ ३९९ (अंदाजे २९,००० रुपये) पासून सुरू होईल आणि लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल. भारतासाठी Apple वॉच 7 ची किंमत यापेक्षा वेगळी असू शकते. अॅपल वॉच सीरिज 3 आणि वॉच एसई लाईनअपमध्ये देखील आहे. कंपनीने फक्त हे उघड केले आहे की, हे घड्याळ या वर्षाच्या अखेरीस उपलब्ध होईल. नवीन iPad मिनी देखील लाँच iPad मिनीमध्ये ८.३ इंच स्क्रीन आहे. ज्यात, टच आयडी वरचे बटण आहे. मागील पिढीच्या आयपॅड मिनीच्या तुलनेत Apple ४० टक्के वेगवान सीपीयू कामगिरी आणि जीपीयू कामगिरीचे आश्वासन देते. हे Device A13 बायोनिक चिपसेटवर देखील चालते. मध्ये आता USB-C पोर्ट आहे. तुम्ही ते आपल्या कॅमेरा, लॅपटॉप, इतर कोणत्याही डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. यात 5G सपोर्ट देखील आहे. आयपॅड मिनीचा मागचा कॅमेरा १२ एमपी आहे जो ४ के मध्ये रेकॉर्ड करू शकतो. डिव्हाइसची सुरुवातीची किंमत $ ४९९ आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kd2TOw