Full Width(True/False)

Bigg Boss Marathi 3 स्पर्धक कलाकारांची संभाव्य यादी

मुंबई : छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त परंतु तितक्याच लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये 'बिग बॉस' चा समावेश होतो. हिंदीबरोबरच मराठी बिग बॉसही प्रेक्षक आवडीने पाहतात. मराठी बिग बॉसचे तिसरे पर्व १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. प्रेक्षकही या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या कार्यक्रमात कोणता कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या स्पर्धेतील संभाव्य कलाकारांची यादी समोर आली आहे. अर्थात कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी स्पर्धकांच्या सहभागाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 'तुला पाहते रे' या कार्यक्रमातून गायत्री दातारने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत तिच्यासोबत सुबोध भावे होता. बिग बॉस मराठीच्या तिस-या पर्वामध्ये गायत्री दातार सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी ३ साठी गायत्रीचे नाव फायनल झाले आहे. इतकेच नाही तर सध्या गायत्री क्वारंटाईन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संग्राम समेळ अभिनेता संग्राम समेळ हा देखील बिग बॉस मराठी ३ च्या घरात सहभागी होऊ शकतो. ई- टाइम्सने याबाबत संग्रामला संपर्क केला तेव्हा त्याने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला. परंतु संग्राम बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो. नेहा जोशी वेब सीरिज, टेलीव्हिजन, सिनेमा अशा सर्व ठिकाणी नेहा जोशी कार्यरत आहे. नेहा देखील बिग बॉस मराठी ३ मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. जेव्हापासून कार्यक्रमाची घोषणा झाली तेव्हापासूनच नेहाचे नाव चर्चेत आहे. शाल्मली खोलगडे बिग बॉस मराठी ३ च्या घरात स्पर्धक म्हणून शाल्मली खोलगडेच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे. शाल्मली हिंदी तसेच मराठी सिनेमासृष्टीमध्ये आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी शाल्मलीच्या सहभागाबद्दल काहीच जाहीर वक्तव्य केलेले नाही. परंतु एका प्रोमोमध्ये आघाडीची गायिका कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. ती गायिका म्हणजे शाल्मलीच आहे, अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. आनंद इंगळे उत्तम अभिनेता म्हणून आनंद इंगळे ने स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. हा गुणी अभिनेता बिग बॉस मराठी ३ कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो. आनंद गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वामध्ये कार्यरत आहे. चिन्मय उदगीरकर घाडगे अँड सन्स या मालिकेतून चिन्मय उदगीरकर याला लोकप्रियता मिळाली आणि तो घराघरात ओळखला जाऊ लागला. बिग बॉस मराठी ३ च्या घरात चिन्मय देखील स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची शक्यता आहे. पल्लवी सुभाष मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पल्लवी सुभाषची ओळख आहे. अर्थात सध्या पल्लवी छोट्या पडद्यापासून दूर असली तरी देखील तिची लोकप्रियत तशीच आहे. त्यामुळे या कार्यक्रमात पल्लवी देखील स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते. नक्षत्रा मेढेकर चंद्र आहे साक्षीला आणि लेक माझी लाडकी या मालिकांमुळे नक्षत्राला लोकप्रियता मिळाली. बिग बॉस मराठी ३ मध्ये नक्षत्रा देखील स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते. घाडगे अँड सन्स या मालिकेमधून मनोरंजन विश्वामध्ये भाग्यश्रीने पदार्पण केले. भाग्यश्री देखील बिग बॉस मराठी ३ मध्ये चिन्मय उदगीरकरसोबत स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3Cb67Ik