Full Width(True/False)

शमिता- राकेशला मागे टाकत दिव्या अग्रवालने पटकावला Bigg Boss Ottच्या विजेत्याचा किताब

मुंबई- गेली अनेक आठवडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस ओटीटी' ने अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. 'बिग बॉस ओटीटी' ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद लाभला. घरातील सदस्यांमधील वाद आणि प्रेम दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. नुकताच 'बिग बॉस ओटीटी' चा महाअंतिम सोहळा पार पडला. घरातील इतर सदस्यांना मागे टाकत अभिनेत्री हिने ' ' च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी घरातील पाच सदस्यांमध्ये प्रचंड चढाओढ होती. निशांत भट्ट, दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट आणि प्रतीक सहजपाल हे सगळेच 'बिग बॉस ओटीटी' च्या ट्रॉफीचे तगडे दावेदार होते. त्यात प्रतीक विजेत्याला मिळणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम घेऊन घराबाहेर पडला. राकेशही या स्पर्धेतून बाहेर पडला. शेवटी शमिता, निशांत आणि दिव्या स्पर्धेत टिकून राहिले. महाअंतिम सोहळ्याच्या अखेरीस शमिता रनर अप ठरल्याने ती देखील निशांत आणि दिव्या यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडली. शेवटी 'बिग बॉस ओटीटी' चा सूत्रसंचालक करण जोहर याने दिव्याचा हात उंचावत ती या सीजनची विजेती असल्याचं जाहीर केलं. दिव्याला सन्मानचिन्ह आणि २५ लाखांचं बक्षीस देण्यात आलं आहे. विजेती ठरल्याने दिव्याच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिला मंचावर रडू कोसळलं. सध्या दिव्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु, 'बिग बॉस ओटीटी' ची विजेती ठरल्याने दिव्याला '' मध्ये सहभागी होता येणार नाही. तर निशांत आणि शमिता यांना 'बिग बॉस १५' च्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39m1LBE