रेडमी हा ब्रँड युजर्समध्ये बजेट फोन उपलब्ध करून देण्यासाठी ओळखला जातो. शिवाय,स्मार्टफोन युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत एकापेक्षा जास्त स्मार्टफोन ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच १५ हजार रुपयांच्या बजेटसह काही सर्वोत्कृष्ट रेडमी स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती देत आहो.यात विविध फीचर्सने परिपूर्ण अशा काही भन्नाट फोन्सचा समावेश आहे. भारतीय बाजारात सध्या Redmi Note 10T 5G, Redmi Note 10S, Redmi 10 Prime, Redmi Note 10, Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9i, Redmi Note 9, Redmi NOte 9 Pro आणि Redmi 9 Prime हे सर्वोत्तम पर्याय आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोन्सच्या किमती १५,००० पेक्षा कमी आहेत. जाणून घेऊया सर्व स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपासून ते किंमत इत्यादी पर्यंत सविस्तर.

रेडमी हा ब्रँड युजर्समध्ये बजेट फोन उपलब्ध करून देण्यासाठी ओळखला जातो. शिवाय,स्मार्टफोन युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत एकापेक्षा जास्त स्मार्टफोन ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच १५ हजार रुपयांच्या बजेटसह काही सर्वोत्कृष्ट रेडमी स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती देत आहो.यात विविध फीचर्सने परिपूर्ण अशा काही भन्नाट फोन्सचा समावेश आहे. भारतीय बाजारात सध्या Redmi Note 10T 5G, Redmi Note 10S, Redmi 10 Prime, Redmi Note 10, Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9i, Redmi Note 9, Redmi NOte 9 Pro आणि Redmi 9 Prime हे सर्वोत्तम पर्याय आहेत.सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोन्सच्या किमती १५,००० पेक्षा कमी आहेत. जाणून घेऊया सर्व स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपासून ते किंमत इत्यादी पर्यंत सविस्तर. .


स्वस्तात मस्त 'टॉप १०' रेडमी स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, पाहा जबरदस्त फीचर्स

रेडमी हा ब्रँड युजर्समध्ये बजेट फोन उपलब्ध करून देण्यासाठी ओळखला जातो. शिवाय,स्मार्टफोन युजर्समध्ये प्रचंड लोकप्रिय सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत एकापेक्षा जास्त स्मार्टफोन ऑफर करत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच १५ हजार रुपयांच्या बजेटसह काही सर्वोत्कृष्ट रेडमी स्मार्टफोन बद्दल सविस्तर माहिती देत आहो.यात विविध फीचर्सने परिपूर्ण अशा काही भन्नाट फोन्सचा समावेश आहे. भारतीय बाजारात सध्या Redmi Note 10T 5G, Redmi Note 10S, Redmi 10 Prime, Redmi Note 10, Redmi 9, Redmi 9 Power, Redmi 9i, Redmi Note 9, Redmi NOte 9 Pro आणि Redmi 9 Prime हे सर्वोत्तम पर्याय आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोन्सच्या किमती १५,००० पेक्षा कमी आहेत. जाणून घेऊया सर्व स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सपासून ते किंमत इत्यादी पर्यंत सविस्तर.



Redmi Note 9 Pro
Redmi Note 9 Pro

फोनमध्ये ६.६७ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले असून ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७२० G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनची बॅटरी ५०२० mAh आहे. Redmi Note 9 Pro च्या ४GB आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे.



Redmi Note 9
Redmi Note 9

फोनमध्ये ६.५३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले असून Octa core MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेंसर, कंपास मॅग्नेटोमीटर सेंसर, गायरोस्कोप सेंसर आणि अॅम्बियंट लाईट सेन्सर आहेत. रेडमी नोट ९ च्या ४GB आणि ६४ GB इंटर्नल स्टोरेज प्रकारांची किंमत ११,९९९ रुपये आहे.



Redmi 9 Prime
Redmi 9 Prime

Redmi 9 Prime मध्ये ६.५३ इंच IPS LCD डिस्प्ले असून फोनमध्ये Mediatek Helio G८० प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे. जे मायक्रो एसडी कार्डद्वारे १००० जीबी पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोन क्रोमियम व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, आणि मिंट ग्रीन मध्ये उपलब्ध आहे. बातमी लिहिताना MI च्या अधिकृत वेबसाइटवर Redmi 9 Prime च्या ४GB रॅम आणि १२८ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११,९९९ रुपये आहे.



Redmi 9i
Redmi 9i

फोनमध्ये ६.५३ इंच डिस्प्ले असून स्मार्टफोनला MediaTek Helio G२५ ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड १० वर आधारित MIUI वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Redmi 9i च्या ४GB आणि ६४GB इंटर्नल स्टोरेज प्रकारांची किंमत ८,७९९ रुपये आहे.



Redmi 9 power
Redmi 9 power

फोनमध्ये ६.५३ इंच सुपर AMOLED डिस्प्ले असून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन MIUI १२ वर Android १० वर आधारित आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी आहे, जी ६७ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रेडमी 9 पॉवरच्या ४GB आणि ६४ GB स्टोरेज प्रकारांची किंमत ११,४९९ रुपये आहे.



Redmi 9
Redmi 9

फोनमध्ये ६.५३ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले असून ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो जी ३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १० आधारित MIUI १२ वर काम करतो. स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे Redmi 9 च्या ४GB आणि ६४GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,४९९ रुपये आहे.



Redmi Note 10
Redmi Note 10

फोनमध्ये ६.४३ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले असून ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे ५१२ जीबी पर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये ५०३० mAh ची बॅटरी आहे जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन MIUI १२ आधारित Android ११ वर काम करतो. Redmi १० च्या ४ GB आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १३,९९९ रुपये आहे.



Redmi 10 Prime
Redmi 10 Prime

फोनमध्ये Redmi 10 Prime MediaTek Helio G८८ प्रोसेसर देण्यात आला असून स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI १२.५ वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ४GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे, जे मायक्रो SD कार्डद्वारे ५१२ GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६००० mAh ची बॅटरी आहे जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या ४ GB आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,४९९ रुपये आहे.



Redmi Note 10S
Redmi Note 10S

Redmi Note 10S ला ६.४३ इंच फुल HD + AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये Octa core MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आले आहे. ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ GB पर्यंत वाढवता येते. स्मार्टफोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. Redmi Note 10T च्या 6GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४, ९९९ रुपये आहे.



Redmi note 10 T 5G
Redmi note 10 T 5G

फोनमध्ये ६.५० इंच सुपर AMOLED डिस्प्ले असून MediaTek Dimension ७०० प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI १२ वर काम करतो. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रो एसडी कार्डद्वारे १००० जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये४८ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, २ मेगापिक्सलचा दुसरा, २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा आहे. फोनच्या च्या ४GB रॅम आणि ६४ GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये आहे.





from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nwSgbk