नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून च्या लाँचिंगची वाट पाहिली जात आहे. हा फोन १० सप्टेंबरला उपलब्ध होणार होता. मात्र, चिपसेटच्या तुटवड्यामुळे लाँचिंग टाळण्यात आले. आता दिवाळीत या फोनला लाँच केले जाण्याची शक्यता आहे. फोनच्या किंमत आणि फीचर्सबाबत अद्याप अनेक रिपोर्ट समोर आले आहेत. मात्र, आता नवीन रिपोर्टमध्ये जिओफोन नेक्स्टची किंमत अधिक असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाचा: आधीच्या रिपोर्टनुसार, फोनची किंमत ३,५०० रुपयांपेक्षा कमी असेल. तर एका रिपोर्टमध्ये फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास ५ हजार रुपये आणि टॉप व्हेरिएंटची किंमत ७ हजार रुपये असेल, असे म्हटले होते. मात्र, नवीन रिपोर्टनुसार फोनची किंमत यापेक्षा अधिक असू शकते. द इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार कंपनी JioPhone Next च्या किंमतीबाबत पुन्हा विचार करत आहे. फोनची किंमत ३,४९९ रुपये असू शकते. मात्र, नवीन रिपोर्टमध्ये फोनची किंमत जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार, चिपसेटच्या तुटवड्यामुळे कंपोनेंट्सच्या किंमतीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे कंपन्यांनी देखील स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवल्या आहे. रिलायन्स जिओला देखील यामुळे JioPhone Next ची किंमत वाढवावी लागू शकते. तसेच, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जिओफोन नेक्स्टची शेल्फ लाइफ देखील मर्यादित असेल. कारण रिलायन्स पुढील वर्षासाठी नवीन SKUs साठी कंपोनेंट्स खरेदी करणार आहे. यामुळे ६-८ महिन्यात कंपोनेंट्सच्या किंमती वाढतील. JioPhone Next चे फीचर्स: लीक रिपोर्टनुसार, JioPhone Next मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१५ प्रोसेसर मिळेल. फोन २ जीबी रॅम आणि ३ जीबी रॅम व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होईल. यात १६ जीबी आणि ३२ जीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. यात २५०० एमएएचची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये रियरला १३ मेगापिक्सल आणि फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोन अँड्राइड ११ गो एडिशनवर काम करेल. यात कॅमेरा एआर फिल्टर्ससारखे लेटेस्ट फीचर्स मिळू शकतात. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ४जी LTE, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/391RVoB