नवी दिल्ली : ने एका लोकप्रिय अ‍ॅपला आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवले आहे. हे Google Play Store वर होते व पैसे कमवण्याच्या उद्देशाने अनेक यूजर्सनी या अ‍ॅपला डाउनलोड केले होते. लोकांना फसवण्याचे काम या अ‍ॅपकडून केले जात होते. आता प्ले स्टोरवर या लिंक्ड अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. तुमच्या फोनमध्ये देखील हे अ‍ॅप असल्यास त्वरित डिलीट करा. वाचा: क्रिप्टोकरेंसीच्या माध्यमातून कमाई करता येईल असे सांगत हे अ‍ॅप यूजर्सला डाउनलोड करण्यास सांगितले जात होते. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क आणि ट्विटरचे संस्थापक जॅक डोर्सीसह अनेकांनी सार्वजनिकरित्या क्रिप्टोकरेंसीबाबत बोलण्यास सुरुवात केल्यानंतर लोकांची रुची यात वाढली आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, क्रिप्टोकरेंसी बिटकॉइनचे मुल्य दुप्पट होणार आहे. बिटकॉइनची किंमत सध्या ५० हजार डॉलर्सपेक्षा कमी आहे. मात्र, लवकरच किंमत १ लाख डॉलर्स व पुढे १,७५,००० डॉलर्सपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांचा यात रस वाढत आहे. मात्र, यामुळे हॅकर्स स्मार्टफोनवर एडवेअर आणि मॅलवेअर डाउनलोड करण्यास यूजर्स प्रोत्साहित करतात. हे हॅकर्स कमी गुंतवणुकीत जास्त मोबदला देण्याचा दावा करतात. मात्र, पैसे गुंतवल्यानंतर यूजर्सला परत पैसे मिळत नाही. अशा बनावट अ‍ॅप्समुळे लोकांची मोठी फसवणूक झाली आहे. सिक्योरिटी रिसर्चर फर्म ट्रेंड मायक्रोने अशाच बिटकॉइन आधारित बनावट अ‍ॅपबाबत माहिती दिली आहे. हे अ‍ॅप अँड्राइड स्मार्टफोन यूजर्सची फसवणूक करत होते. सिक्योरिटी रिसर्च फर्मने ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुगल प्ले स्टोरवरील एक अँड्राइड अ‍ॅप यूजर्सची फसवणूक करत आहे. या अ‍ॅपचे नाव ‘डेली बिटकॉइन रिवॉर्ड्स क्लाउड आधारित माइनिंग सिस्टम’ आहे. हे अ‍ॅप यूजर्सकडून महिन्याला १५ डॉलर्स फी घेऊन फसवणूक करत असे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tJWQ7a