नवी दिल्लीः सॅमसंग, रेडमी, पोको सारख्या कंपन्यांनी आपले स्मार्टफोन्स मोठ्या बॅटरी सोबत लाँच केले आहेत. जर तुम्हाला मोठ्या बॅटरीचे स्मार्टफोन खरेदी करायचे असेल तर तुम्ही या कंपनीचे 6000mAh च्या बॅटरीचे स्मार्टफोन खरेदी करू शकता. Realme Narzo 30A Realme Narzo 30A ची किंमत ८ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. यावर्षीच्या सुरुवातीला या फोनला लाँच करण्यात आले आहे. Realme Narzo 30A मध्ये मीडियाटेक हीलियो जी ८५ प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा स्क्रीन दिले आहे. या फोनच्या रियर मध्ये १३ मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच फास्ट चार्जिंग सपोर्ट या फोनमध्ये मिळतो. Redmi Note 10 Prime Redmi Note 10 Prime स्मार्टफोनला नुकतेच लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८८ प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. Samsung Galaxy M32 Samsung Galaxy M32 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. याचा प्रायमरी कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी ८० प्रोसेसर दिले आहे. याचा रिफ्रेश रेट ९० एचझेडचा आहे. Poco M3 पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी दिली आहे. याची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या सेगमेंट मध्ये हा स्मार्टफोन जबरदस्त आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा स्क्रीन दिली आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर दिले आहे. या फोनमध्ये मोठी बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tDpBT1