मुंबई : बॉलिवूडच्या अभिनेता त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या अतरंगी फॅशनसाठी आणि एअरपोर्टवरील हटके लूकसाठी ओळखला जातो. अनेकदा त्याचे अशा हटके लूकमधील फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात आणि ते पाहून सोशल मीडियावरील युझर्स त्यावर कॉमेन्ट करत असतात. आता देखील रणवीर सिंह पुन्हा एकदा एअरपोर्टवर दिसून आला. याही वेळी त्याचा लूक नेहमीप्रणाणे अतरंगी होता. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर युझर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेन्ट करत आहेत. काहींना रणबीरचा लूक आवडला आहे तर काहींना अजिबात आवडलेला नाही. तर काहींनी हा कधीच सुधारणार नाही... अशाही कॉमेन्ट केल्या आहेत. रणवीरने बांधल्या दोन पोनीटेल या फोटोंमध्ये रणवीरने एक नाही तर चक्क दोन पोनीटेल बांधल्या आहेत. रणवीरच्या या अतरंगी लूकमुळे सोशल मीडियावरील युझर्सचे लक्ष वेधले गेले नाही तरच नवल.. युझर्सच्या कॉमेन्ट रणवीरचे सोशल मीडियावरील हे फोटो पाहून युझर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमेन्ट करू लाले आहेत. काही तर मजेशीर कॉमेन्ट करत आहेत. एकाने लिहिले आहे की याच्या डोक्यावर नाराळाचं झाड उगवलं की काय? दरम्यान, रणवीरच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचे तर अनेक मोठ्या बॅनरचे प्रोजेक्ट त्याच्याकडे आहेत. '83' हा त्याचा आगामी सिनेमा रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दीपिका पादुकोणही दिसणार आहे. लग्नानंतर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jYTny5