Full Width(True/False)

नवजात बालकाचे आधार कार्ड काढणे झाले खूपच सोपे, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : हे महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक आहे. बँकेपासून ते शाळेतील अ‍ॅडमिशनपर्यंत प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून गरजेचे आहे. आधार कार्ड नसल्यास तुम्हाला अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. वाचा: सरकारी कागदपत्रांसोबतच अनेक खासगी कामांसाठी देखील आधार कार्ड उपयोगी येते. आता ने लहान बाळांचे आधार कार्ड बनवण्याच्या नियमात बदल केला आहे. UIDAI नुसार, जन्मदाखला अथवा हॉस्पिटल डिस्चार्जसह स्वतःची कागदपत्रं देऊन पालक बाल आधार कार्डासाठी अर्ज करू शकतात. या कागदपत्रांची गरज ५ वर्षांखालील लहान बाळांसाठी बायोमेट्रिक माहिती गरजेची नसते. बाल आधारसाठी पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लाइसेंस, रेशन कार्ड अथवा सार्वजनिक वितरण प्रणाली फोटो कार्ड, वोटर आयडी, शस्त्राचे लायसन्स, भारत सरकारद्वारे जारी फोटो आयडी प्रूफ, मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेचे , PSU द्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडी कार्ड, नरेगा रोजगार कार्ड, फोटो क्रेडिट कार्ड, पेंशनर फोटो कार्ड, स्वातंत्र्य सैनिक पोटो कार्ड, शेतकरी पासबुक, CGHS फोटो कार्ड, लग्नाचा पुरावा, नावात बदल केल्याचा पुरावा, ECHS फोटो कार्ड, राजपत्रित अधिकारी अथवा तहसीलदारद्वारे जारी केलेले ओळखपत्र, राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश अथवा प्रशासनाने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र गरजेचे आहे. पत्त्याच्या पुराव्यासाठी ओळखपत्र पत्त्याच्या पुराव्याच्या व्हेरिफिकेशनसाठी बँक पासबुक, बँक स्टेटमेंट, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, पालकांचा पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, पीएसयूद्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडी कार्ड, ३ महिने जुने वीज बिल, ३ महिने जुने पाणी बिल, टेलिफोन लँडलाइन बिल, करपावती, क्रेडिट कार्ड स्टेटमेंट, विमा पॉलिसी, बँकेद्वारे सही असलेल्या लेटर हेडवर फोटो व पत्ता, ऑफिसद्वारे जारी लेटर हेडवर पत्ता-फोटो, नरेगाचे रोजगार कार्ड, शस्त्र लायसन्स, पेंशन कार्ड, स्वातंत्र्य सैनिक कार्ड, शेतकरी पासबुक, सीजीएचएस कार्ड, ईसीएचएस कार्ड, आयकर विभागाने केलेली पडताळणी, वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, भाडेकरार, राज्य सरकारद्वारे जारी रहिवासी दाखला, ३ महिने जुने गॅस कनेक्शन बिल ही कागदपत्रं लागतील. वरील कागदपत्रांपैकी काही ठराविकच कागदपत्रं पुरावा म्हणून द्यावी लागतील. बाल आधार कार्ड बनवण्यासाठीची प्रक्रिया
  • बाल आधार कार्ड बनवण्यासाठी सर्वात प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • येथे आधार कार्ड रजिस्ट्रेशन पर्याय निवडा.
  • आता तुम्हाला आवश्यक ती माहिती भरावी लागेल. यात बाळाचे नाव व अन्य बायोमेट्रिक माहितीचा समावेश असेल.
  • आता पत्ता, राज्य इत्यादी माहिती भरा.
  • आता तुम्हाला आधार कार्ड रजिस्ट्रेशन शेड्यूल करण्यासाठी अपॉइंटमेंट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • शेवटी तुम्हाला जवळील रजिस्ट्रेशन सेंटरची निवड करावी लागेल. त्यानंतर तारीख व वेळ निवडा. निवडलेल्या तारखेला जाऊन तुम्ही आधार बनवू शकता.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y5WlJ5