Full Width(True/False)

iPhone 12 आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त किंमतीत खरेदीची संधी; ४४,९९९ रुपयांपर्यंत बंपर डिस्काउंट

नवी दिल्लीः Flipkart आपल्या बिग बिलियन डेज़ सेल दरम्यान ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर पर्यंत स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, TWS ईयरबड्ससह अन्य इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सची एक वाइड रेंज वर अनेक डील्स आणि डिस्काउंट देणार आहे. यातील सर्वात चांगली डील्स पैकी एक म्हणजेच Apple आहे. याशिवाय, Flipkart युजर्संना इंस्टेंट डिस्काउंट ऑफर, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट EMI ऑफर आणि खूप काही देणार आहे. बेस्ट आयफोन १२ डील आतापर्यंत फ्लिपकार्ट आपला वार्षिक बिग बिलियन डेज सेल ३ ऑक्टोबर पासून सुरू करणार आहे. सर्वात चांगल्या डील पैकी Apple iPhone 12 वर उपलब्ध आहे. जाणून घ्या सर्व ऑफर्स संबंधी. Apple iPhone 12 डील आयफोन १२ ची किंमत ४९ हजार ९९९ रुपये आहे. गेल्यावर्षी लाँच झालेल्या आतापर्यंतची सर्वात चांगली कमी किंमत आहे. अन्य ऑफर ग्राहक कमी किंमतीत फोन खरेदीसाठी अन्य दुसऱ्या ऑफर्सला जोडू शकतो. अॅक्सिस बँक आणि ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना १० टक्के डिस्काउंट ऑफर मिळवण्यास पात्र आहे. ज्यामुळे किंमत ४४ हजार ९९९ रुपयांपर्यंत कमी होते. पेटीएम ग्राहक वॉलेट आणि यूपीआय देवाण घेवाण केल्यास कॅशबॅकसाठी पात्र ठरणार आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज आणि अन्य ऑप्शन मिळेल. Apple iPhone 12 ची लाँचिंग किंमत अॅपलने आयफोन १२ सीरीजला iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro, आणि iPhone 12 Pro Max ऑक्टोबर २०२० मध्ये लाँच केले होते. आयफोन १२ च्या ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी ७९ हजार ९०० रुपये किंमतीत लाँच केले होते. १२८ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी ८४ हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत ९४ हजार ९०० रुपये होती. आयफोन १३ च्या लाँचिंगनंतर किंमतीत कपात अॅपल कंपनीने आयफोन १३ सीरीजला नुकतेच लाँच केले आहे. नवीन आयफोन सीरीजच्या लाँचिंग नंतर आयफोन १२ आणि अन्य काही जुन्या मॉडलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आयफोन १२ च्या ६४ जीबी स्टोरेजसाठी ६५ हजार ९०० रुपये, १२८ जीबी स्टोरेजसाठी ७० हजार ९०० रुपये आणि २५६ जीबी स्टोरेजसाठी ८० हजार ९०० रुपये झाली आहे. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3AUzJJW