मुंबई : अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया या मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आईची प्रकृती सुधारावी, यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, प्रत्येक प्रार्थना तिच्यासाठी महत्त्वाची आहे, असे आवाहन अक्षय कुमारने एका पोस्टद्वारे चाहत्यांना केले आहे. आईच्या प्रकृतीविषयी अक्षय कुमारने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी ही वेळ फार कठीण असल्याचे त्याने नमूद केले आहे. काय लिहिले आहे अक्षयने आईची प्रकृती बिघडल्यामुळे अक्षयकुमार खूपच भावूक झाला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ' तुम्हा सर्वांचे आभार कसे मानावे हेच कळत नाहीये. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना मला जाणत आहेत. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. माझ्या आईच्या प्रकृतीविषयी तुम्ही जी काळजी व्यक्त केली, त्यासाठी आभार... माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही फार कठीण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनांची फार गरज आहे,' असे अक्षयने या पोस्टमध्ये लिहिले आहे. पोस्टच्या शेवटी त्याने हात जोडण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. अक्षय कुमारच्या आईची तब्येत चिंताजनक आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आईची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर तातडीने सोमवारी पहाटे युकेहून मुंबईला परतला. तो तिथे आगामी 'सिंड्रेला' या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी युकेला गेला होता. आईच्या तब्येतीची बातमी समजल्यानंतर तो चित्रीकरण अर्ध्यावर सोडून परतला आहे. अक्षयने निर्मात्यांना त्याची आवश्यकता नसलेल्या दृश्यांचे चित्रीकरण करण्यास सांगितले आहे. अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अरुणा या निर्माती असून त्यांनी बॉलिवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये 'हॉलिडे', 'रुस्तम' या सिनेमांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zW3fOW