नवी दिल्ली : करोना मुळे वर्क फ्रॉम होमचे आणि पर्यायाने वापराचे प्रमाण देखील वाढले आहे. कित्येक कर्मचारी अजूनही घरूनच काम करत असून यामुळे युजर्सना त्यांच्या लॅपटॉपवर ८ ते १० तास किंवा त्याहून अधिक वेळ देखील काम करावे लागते. अशा परिस्थितीत, लॅपटॉप जास्त गरम होऊन खराब होण्याची शक्यता देखील वाढते . बरेच लोक लॅपटॉपच्या ओव्हरहिटिंग समस्येकडे दुर्लक्ष करतात. पण, ते चुकीचे आहे. या समस्येमुळे, लॅपटॉप खूप लवकर खराब होऊ शकतो. आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही ही समस्या टाळू शकता. वाचा: कुलिंग फॅन ओव्हरहिटिंगची समस्या जुन्या लॅपटॉपमध्ये जास्त असते त्यामुळे जुने लॅपटॉप वापरणे टाळा. जर लॅपटॉप जुना असेल तर त्याचे फॅन्स निश्चित करा. लॅपटॉपचा कूलिंग फॅन जास्त गरम होण्यापासून संरक्षण करतो. लॅपटॉपचा फॅन वेळोवेळी स्वच्छ करावा. अस्वच्छता काढून न टाकल्यामुळे फॅन खराब होते किंवा कूलिंग कमी होते. तसे असल्यास, लॅपटॉपचे कूलिंग फॅन दुरुस्त करा. लॅपटॉप उशा, ब्लँकेटवर ठेवू नका लॅपटॉप उशा, ब्लँकेट किंवा रजाईवर ठेवू नका. लॅपटॉप नेहमी सपाट पृष्ठभागावरच वापरला पाहिजे. लॅपटॉप थंड होण्यासाठी हवा घेतात. जर तुम्ही या गोष्टींवर लॅपटॉप ठेवला , तर लॅपटॉपमध्ये चांगले वेंटिलेशन होऊ शकणार नाही. नियमितपणे लॅपटॉप स्वच्छ करा एयरफ्लोत धूळ जमा झाल्यामुळे लॅपटॉप जास्त गरम होतो. अशा परिस्थितीत प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी लॅपटॉप सतत स्वच्छ करणे आवश्यक आहे. काम केल्यानंतर लॅपटॉप बंद करा वर्क फ्रॉम होम दरम्यान लॅपटॉप अनेक तास सतत सुरु असते. म्हणूनच, जेव्हा काम संपेल तेव्हा लॅपटॉपला थोडी विश्रांती द्या. झोपण्यापूर्वी लॅपटॉप बंद करणे आवश्यक आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yKzejH