मुंबई : बॉलिवूडच्या आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारची आई यांची तब्येत गंभीर आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना मुंबईतील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आईची प्रकृती गंभीर असल्याची बातमी समजल्यानंतर तातडीने लंडनहून मुंबईत सोमवारी दाखल झाला. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयची आई अरुणा भाटिया गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिरानंदानी इस्पितळात दाखल आहे. तिथे त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत. अक्षय कुमार त्याच्या सिंड्रेला या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला होता. आईची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने चित्रीकरण अर्धवट सोडून मुंबईला परतला आहे.अक्षय आणि त्याच्या आईमध्ये खास नाते आहे. त्यामुळेच आईच्या आजारपणाची बातमी मिळाल्यानंतर तो तातडीने मुंबईला आला आहे. काही आठवड्यांपूर्वीच अक्षय त्याच्या आगामी सिंड्रेला या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी युकेला गेला होता. परंतु आईच्या प्रकृतीची बातमी समजल्यावर तो आईसोबत राहण्यासाठी म्हणून तातडीने मुंबईला परतला आहे. दरम्यान, त्याने निर्मात्यांना ज्या दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती दृश्ये चित्रीत करावी असे सांगितले आहे. या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. अरुणा या देखील सिनेनिर्मात्या होत्या. त्यांनी हॉलिडे, नाम सबनम आणि रुस्त या सिनेमांची निर्मिती केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kTn9U8