मुंबई- बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असते. श्रद्धा तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे श्रद्धा नेटकऱ्यांकडून ट्रोल होत आहे. मदत मागणाऱ्या एका वृद्ध व्यक्तीला मदत न केल्यामुळे श्रद्धा ट्रोल होत आहे. श्रद्धा तिच्या मित्रांसोबत फिरायला आली असताना घडलेल्या या घटनेला इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला आहे. व्हिडिओनुसार, श्रद्धा तिच्या मित्रमैत्रिणीसोबत जुहू येथे आली असताना ती एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडते. श्रद्धाच्या मागे एक वृद्ध व्यक्ती मदतीसाठी याचना करताना दिसतात. मात्र श्रद्धा मित्रमैत्रिणीसोबत बोलण्यात व्यस्त असल्याने ती त्या वृद्ध व्यक्तीकडे दुर्लक्ष करते. परंतु, तो वृद्ध व्यक्ती पुन्हा श्रद्धाच्या मागे जाऊन मदतीसाठी याचना करतो. तेव्हा मात्र श्रद्धा त्या व्यक्तीला नमस्कार करते आणि तिथून निघून जाते. श्रद्धाचं वागणं नेटकऱ्यांना मुळीच पटलेलं नाही. नेटकरी श्रद्धाला तिच्या वागण्यासाठी ट्रोल करत आहेत. श्रद्धाच्या नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत तिला एवढे पैसे काय करणार आहेस, असा प्रश्न विचारला आहे. एका युझरने कमेंट करत लिहिलं, 'एवढी श्रीमंत आहे मग एका वृद्ध व्यक्तीची मदत नाही करू शकत?' दुसऱ्या व्यक्तीने कमेंट करत लिहिलं, 'तुला लाज वाटली पाहिजे, तू त्यांना काहीच मदत केली नाहीस.' आणखी एका व्यक्तीने कमेंट करत लिहिलं, 'इतके कोट्यवधी रुपये कमावतात पण त्या काकांना एक पार्सल देऊ शकत नाही. पैसे नाही पण निदान काही खायला तरी देऊ शकता ना.' एका युझरने लिहिलं, 'एवढी मोठी बॅग घेऊन का फिरता जर त्यांना १० रुपये देऊ शकत नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/393dmW0