मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री बिनधास्त असल्याने सहजासहजी कुणीही तिच्या वाट्याला जाण्याचा विचारही करत नाही. तिच्या फटकळ बोलण्याने ती समोरच्याची बोलतीच बंद करते. तिचं प्रत्येक मत कोणालाही न घाबरता ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रत्येक दिवशी ती नवीन ट्विट करत असते. कधी स्वतःची तुलना मोठमोठ्या कलाकारांसोबत करते. तर कधी तिला ट्रोल करणाऱ्यांची चांगलीच शाळा घेते. या वेळेसही तिने ट्विटरवर तिला मूर्ख म्हणणाऱ्या एका युजरला सुनावलं आहे. सोशल मीडियावर एका पत्रकाराने कंगनाला मूर्ख आणि अशिक्षित म्हटलं. त्यावर कंगना रागाने लाल झाली. तिने त्या पत्रकाराला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिच्या मते तिचे ट्विट हे जास्त बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींसाठी असतात. कंगनाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या विरुद्ध एक प्रतिक्रिया दिली होती. त्या प्रतिक्रियेवर एका पत्रकाराने कंगनाच्या विरोधात ट्विट केलं आणि म्हटलं, 'ती एक मूर्ख, अशिक्षित आणि बावळट व्यक्ती आहे जिला वाटतं की, तिला सगळं काही माहीत आहे आणि तरीही ती रेड इंडियन सारख्या अपमानास्पद शब्दांचा वापर करते.' हे ट्विट पाहिल्यावर कंगनाचा राग अनावर झाला आणि तिने त्याला उत्तर दिलं. तिने ट्विट करत लिहिलं, 'माझे ट्विट फक्त डोकं असणाऱ्या आणि उत्तम बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तींसाठी असतात. मी इथे बसून प्रत्येक मूर्ख माणसाला समजावू शकत नाही. शब्द आणि वेळ जास्त नाहीये. तुम्ही कशासाठी उत्साहीत आहात? मी हे तुमच्यासाठी नाही लिहिलं. आणि रेड इंडियन्सचं काय? तुला तर हे देखील माहीत नाही की, ब्रँडो एक मूळ अमेरिकन आहे. चिल्लर..' असे अनेक ट्विट करत कंगनाने त्याची बोलती बंद केली आहे. कंगनाचं हे ट्विट सोशल मीडियावर वायरल होत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/37SraCA