Full Width(True/False)

मस्तच! गुगलचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन येतोय, सॅमसंगला मिळणार जोरदार टक्कर

नवी दिल्ली : लवकरच Pixel 6 सीरिज लाँच करण्याच्या तयारीत आहे. यातच आता कंपनी या वर्षाखेर आपला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे. फोल्डेबल स्मार्टफोन मार्केटमध्ये सध्या सॅमसंगचा दबदबा आहे. सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच आणि ला लाँच केले आहे. वाचा: अनेक कंपन्या आता फोल्डेबल स्मार्टफोन्स आणण्याचा विचार करत आहे. यातच एक डिस्प्ले सप्लाय चेन कंसल्टेंट्सचे सीनियर डायरेक्टर डेव्हिड नारंजोने ट्विटद्वारे बाबत माहिती दिली आहे व हा फोन २०२१ च्या तिमाहीत लाँच होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुगलच्या या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये इतर प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये रियरला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल असेल. सोबतच, १२ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि ४८ मेगापिक्सल टेलिफोन कॅमेरा दिला जाईल. गुगलचा अंडर स्क्रीन कॅमेरा देखील कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनसोबत लाँच होऊ शकतो. रिपोर्टनुसार, गुगलच्या पहिल्या फोल्डेबल फोनमध्ये १२ जीबी रॅमसह Tensor प्रोसेसर असेल. सोबतच, ५१२ जीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. गुगलने अद्याप अधिकृतरित्या अपकमिंग फोल्डेबल स्मार्टफोनबाबत माहिती दिलेली नाही. मात्र, एका फोल्डेबल प्रोटोटाइपच्या टेस्टिंगबाबत कंफर्मेशन कंपनीने दिले आहे. रिपोर्टनुसार, गुगलने फोल्डेबल फोन्ससाठी LTPO OLED पॅनेलसाठी सॅमसंगसोबत करार केला आहे. गुगलच्या या फोनमध्ये ७.६ इंच डिस्प्ले दिला जाईल. गुगल आपल्या फोल्डेबल फोनच्या किंमतीद्वारे सॅमसंगला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nGJKXj