Full Width(True/False)

रियलमीचे हे तीन नवीन प्रोडक्ट्स भारतात २४ सप्टेंबरला लाँच होणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : Realme चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. Realme Narzo 50 Series भारतात २४ सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येणार असून यासह, आणि 32-inch देखील त्याच दिवशी देशात लाँच करण्यात येणार आहे . कंपनीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. कंपनी Narzo 50A, Narzo 50 आणि Narzo 50 Pro ला Narzo 50 मालिकेअंतर्गत लाँच करू शकते. अशी अपेक्षा देखील वर्तविण्यात येत आहे. वाचा: २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता कंपनीतर्फे आयोजित एका व्हर्च्युअल इव्हेन्टमध्ये Realme Narzo 50 मालिका, Realme Band 2 आणि Smart TV Neo 32-inch भारतात सादर करण्यात येणार असून कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग कंपनीच्या YouTube चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर करण्यात येईल. Realme ने वेबसाइटवर Narzo 50 मालिकेसाठी एक डेडिकेटड पेज जारी केले असून त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, आगामी फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो G 85 प्रोसेसर, एआरएम माली G 52 जीपीयू,६,००० एमएएच बॅटरी, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा आणि सुपर पॉवर सेव्हिंग मोड असेल . या मालिकेअंतर्गत Narzo 50A लाँच करण्यात येणार असलयाचे कंपनीचे सीएमओ फ्रान्सिस वोंग यांनी कन्फर्म केले आहे. Realme Band 2 नुकताच मलेशियात लाँच करण्यात आला असून यामध्ये,युजर्सना १.४ -इंच टच डिस्प्ले, ५० वैयक्तिकृत डायल फेस, हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर मिळेल. याव्यतिरिक्त, यात ९० स्पोर्ट्स मोड, ५० मीटर वॉटर रेझिस्टन्स, ब्लूटूथ v५.१ सपोर्ट आणि १२ दिवस बॅटरी लाइफ मिळेल. हे डिव्हाइस मलेशियामध्ये MYR १३९ (सुमारे २,५०० रुपये) मध्ये लाँच करण्यात आले आहे. भारतात देखील हे याच श्रेणीमध्ये लाँच केले जाऊ शकते. स्मार्ट टीव्ही Neo- 32 inch इंच देखील या कार्यक्रमात लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीने कन्फर्म केले आहे. कंपनीने वेबसाइटवर यासाठी एक डेडिकेटेड पेज जारी केला असून त्यात नमुद करण्यात आले आहे की, हा टीव्ही प्रीमियम बेझल-लेस एलईडी डिस्प्ले, २० डब्ल्यू ड्युअल स्पीकर्स आणि बिल्ट-इन यूट्यूबसह येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ewk6KT